कामचुकार अभियंत्यांवर कारवाई करा- सोपटे, सरदेसाईंनाही सुनावलं

विजय सरदेसाईंनीही सोपटेंनी सुनावलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : विजय सरदेसाई आणि सोपटेंमध्ये विधानसभेत चांगलीच जुंपली. वीज खात्यावर आमदार दयानंद सोपटेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मांद्रे मतदारसंघावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळाली. तसंच कामचुकार अभियंत्यांवर कारवाई करा, असी आमदार सोपटेंनी मागणी केली आहे. बाचाबाचीनंतर सोपटेंनी सरदेसाईंना सुनावलंय. विजय सरदेसाईंनी मला शिकवू नये, असं सोपटेंनी वक्तव्य केलंय.

सोपटे म्हणाले की…

तेरेखोलमधील लोकं अजूनही महाराष्ट्राच्या वीजेवर अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं. ६० वर्ष झाली गोव्याला मुक्त होऊन. मात्र अजूनही वीजेचा प्रश्न सुटलेला नसल्याचं पाहायला मिळलं. टेंडर निघतात. पण काम होत नाही. सातत्यानं सुधारीत अंदाजपत्र काढलं जात असल्याचा प्रकार संशयास्पद आहे.

सरदेसाईंना सुनावलं…

एकाच मतदारसंघावर किती वेळ चर्चा करणार, असा सवाल विजय सरदेसाईंनी उपस्थित केला होता. त्यावरुन सोपटे संतापले. त्यांनी मांद्रेबद्दल काय बोलयाचं आणि काय नाही, हे मला शिकवू नये, असं त्यांनी सुनावलंय.

वीजमंत्री काब्रालांचं उत्तर –

केरी-तेरेखोलला वीजपुरवठा महाराष्ट्रातूनच केला जातो. त्यासाठी गोवा सरकार महाराष्ट्राला पैसे देत असल्याची माहिती काब्राल यांनी दिलं आहे. किनाऱ्यापलिकडील भाग असल्यानं तिथं वीज पोहोचवणं कठीण असलं तरी योग्य ती पावलं उचलली जातील. या भागात आधीपासूनच लोडशेडिंग सुरु असल्यानं लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

VIDEO | LIVE HD | हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसरा दिवस – विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये वादळी चर्चा

पाहा व्हिडीओ – LOBO | ‘गोवा माईल्सचा पर्रीकरांचा निर्णयही अंगलट’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!