बंपर नोकरभरती… कुठे किती जागा? अप्लाय कसं कराल? वाचा सगळे डिटेल्स

मिशन-2022ची जय्यत तयारी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : राज्यात 2016 पासून स्थगीत ठेवलेल्या नोकरभरतीला जोमात सुरूवात करण्याचा सपाटाच सरकारने लावलाय. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी 11 हजार सरकारी पदे तर 37 हजार खाजगी क्षेत्रात पदांची भरती केली जाईल, असं खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पावेळी जाहीर केलंय. महापालिका आणि अन्य सहा नगरपालिका निवडणुकांतील यशानंतर एकामागोमाग विविध सरकारी खात्यांतील पदांच्या जाहीरातींचा सपाटाच सुरू झालाय. पहिल्या टप्प्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या गोवा मेडिकल कॉलेजातील सुमारे ९०० पदांच्या जाहीरातीनंतर शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्याअंतर्गत पोलिस खात्यात एक हजाराहून अधिक पदांची घोषणा करण्यात आलीय.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात 2016 साली नोकर भरती स्थगित ठेवण्यात आली होती. पार्सेकरांनी ही भरती करण्याची सगळी तयारी केली होती परंतु तत्कालीन केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मात्र आर्थिक परिस्थितीच्या कारणांवरून ही नोकरभरती स्थगित ठेवण्याचे आदेश दिल्याने ही नोकर भरती रखडली. या स्थगितीचे गंभीर परिणाम भाजपला 2017 च्या निवडणुकीत भोगावे लागले. 21 जागांवरून भाजपची थेट 2017 मध्ये 13 जागांवर घसरण झाली. दरम्यान, 2016 मध्ये कोविड महामारी नव्हती. खाण उद्योग सुरू होऊन पुन्हा बंद पडला होता. पर्यटन आणि इतर उद्योग सुरळीतपणे सुरू होते. तरीही आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे नोकरभरती स्थगित ठेवण्यात आली होती.

दुष्काळात तेरावा…

राज्यात खाण उद्योग अद्यापही सुरू झालेला नाही. कोविड-१९ महामारीमुळे सगळेच आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. नुकतेच कुठे आर्थिक व्यवहार सुरळीत होत असता नव्याने कोविड-१९ ची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झालीए. राज्यावर सुमारे २० हजार कोटींपेक्षा अधिक कर्जाचा भार पडलाय. नव्या आर्थिक महसूल स्त्रोतांचा पत्ता नाही तरीही राज्य सरकारने नोकर भरतीचा अजेंडा पुढे नेण्याचा चंग बांधलाय. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष असतानाच सरकारी नोकऱ्यांची पदे जाहीर झाल्याने मोठ्या प्रमाणात युवा पिढीला गुंतवून ठेवून निवडणूक जिंकता येईल, असा सरकारचा कयास आहे. प्रत्यक्षात यातील किती नोकर भरती होईल की केवळ अर्ज सादर करण्यास लावून बेरोजगारांना ताटकळत ठेवण्याचा प्रकार घडतो याबाबत संभ्रम निर्माण झालाय.

जीएमसीनंतर सर्वाधिक गृह खात्यात भरती

आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे नोकरभरतीबाबत खूपच आग्रही आहेत. त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडलीय. मुळात काँग्रेसमधून भाजपात आल्यानंतर त्यांनी आपला इरादा स्पष्टच केला होता. सर्वांत पहिली नोकर भरती जीएमसीची जाहीर झाली. तिथे सुमारे ९०० पदांची भरती केली जाणार आहे. आता त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडील गृह खात्यात 1097 पदांची घोषणा झालीय. यापुढेही मोठ्या प्रमाणात सर्वच खात्याची पदे जाहीर होणार आहेत. आत्तापर्यंत सहकार निबंधक, बंदर कप्तान, आरोग्य, पोलिस आदींची पदे जाहीर झालीत. उर्वरीत पदे ह्याच काळात जाहीर होणार आहेत.

कुठे किती जागा?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!