शाळांच्या देखभाल निधीबाबत सरकार जागरूक : मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : शाळांच्या देखभाल निधीबाबत आमदार सुदिन ढवळीकरांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे. शाळांच्या देखभाल निधीबाबत सरकार जागरुक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच शाळांच्या देखभालीसाठी पुरेसा निधी दिला जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलंय.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशाचं कामकाज सुरु झालं असून यावेळी प्रश्नोत्तराचा तासावेळी सुदिन ढवळीकरांनी शाळांच्या देखभालीवर सरकारचं लक्ष वेधलं होतं.
तसंच महसूल खात्याचे भूरूपांतर शुल्क जाचक असल्याची तक्रारही आमदार सुदिन ढवळीकरांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नावरही लक्ष केंद्रीत केलं.

त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शैक्षणिक संस्थांचं देखरेख अनुदान ३१ मार्चपर्यंत देणार असल्याचं प्रमोद सावंत यांनी नमूद केलंय. शिक्षकांना कोरोना काळात सुट्टी मिळाली नसल्याच्या तक्रारीबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी शिक्षकांना सिकलिव्हसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा – तुफान गाजतंय! अभिमान वाटावा असं कोकणीतलं Unplugged गाणं अजून नाही पाहिलं?