शिंदे गट आणि शिवसेनेच्या याचिकांवर उद्या सुनावणी, जाणून घ्या नेमकं काय घडलं?…

शिंदे गटाने आपल्या वर्तनाने पक्ष सोडल्याचं सिद्ध केलं आहे, उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : शिवसेना कुणाची व बंडखोर आमदारांची अपात्रता, यावरून सुरू झालेल्या सत्ता संघर्ष वादावरील सुनावणी उद्या न्यायालयात होणार आहे. आज झालेल्या सुनावणी प्रक्रियेत उद्या याबाबत निर्णय घेऊ, असा आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा:८२ वर्षांचे आजोबा पंचायत निवडणूकीच्या रिंगणात…

यावर होणार शिक्का मोर्तब

दरम्यान उद्या हे प्रकरण सकाळी पहिल्याच पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नेमकी पुढील भूमिका काय ? यावर शिक्का मोर्तब होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गट शिवसेनेतच आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा:’या’ पंचायतीची निवडणूक भाजप, काँग्रेस नेत्यांसाठी प्रतिष्ठेची…

दोन्ही गटांच्या ‘या’ आहेत मागण्या

आपण शिवसेना सोडली नसल्याचा शिंदे गटाचा दावा असून ४० आमदारांना १५ आमदारांचा गट अपात्र ठरवू शकत नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे. राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार शिंदे गटातील आमदारांनी अन्य पक्षात विलीनीकरण न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी शिवसेनेची मागणी आहे.
हेही वाचा:तळीरामांना वाहतूक पोलिसांचा दणका ; 28 जणांवर कारवाई…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!