मायकल लोबो धडधडीत खोटं बोलले- गोवा माईल्स

गोवा माईल्सच्या पराशर खोतांचा लोबोंवर घणाघात

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : मंत्री मायकल लोबोंनी पर्रीकरांवरुन केलेल्या विधानामुळे एकच चर्चा रंगली आहे. अशातच गोवा माईल्सनं पत्रकार परिषद घेऊन मायकल लोबो धडधडीत खोटं बोलत असल्याचा आरोप केलाय. पर्रीकरांना कुणालाही विश्वासात न घेता गोवा माईल्स सुरु केल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन गोवा माईल्सचे पराशर खोत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मायकल लोबोंनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिलंय.

पर्रीकरांनी मुख्यमंत्री असताना मायकल लोबोंनाही गोवा माईल्स सुरु करण्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यावेळी मायकल लोबोंनीही गोवा माईल्स सुरु करण्याला कोणताही विरोध दर्शवला नव्हता, उलट पाठिंबाच दिला होता, असं पराशर खोत यांनी म्हटलंय. पर्रीकर हयात नसल्याचं पाहून मायकल लोबो खोटं बोलून फायदा उचलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही खोत यांनी यावेळी केलाय. तसंच एअरपोर्टवर काऊंटरवर उभ्या असणाऱ्या गोवा माईल्सच्या टॅक्सीवरुन उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. नेमकं यावेळी मायकल लोबोंच्या प्रश्नाला उत्तर देताना गोवा माईल्सचे पराशर खोत काय म्हणाले, ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

गोवा माईल्सची पत्रकार परिषद LIVE

काय म्हणाले लोबो?

टॅक्सीचालकांच्या प्रश्नावर माझं व्यक्तिगत लक्ष आहे. पर्रीकरांना गोवा माईल्सची चुकीची कल्पना देण्यात आली. गोवा माईल्स गोव्यामध्ये नाही चालू शकत. गोवा माईल्समुळे स्थानिकांना त्रास होतो आहे. जर गोवा माईल्स ऍप बेज्झ टॅक्सीसेवा आहे, तर दाबोळी विमानतळवर त्यांचा काऊंटर का आहे? पर्रीकरांनी गोवा माईल्सच्या घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक टॅक्सी चालक अडचणीत आले आहेत. त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला. त्याचा फटका आता सहन करावा लागतोय. या संपूर्ण वादावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. लवकरच हा वाद कायमचा मिटवण्यासाठी तोडगा काढण्यात येईल. मात्र गोवा माईल्सवर तातडीनं बंदी आणण्याच निर्णय तडकाफडकी घेतला जाऊ शकत नाही. त्यावर अभ्यास करुन आणि चर्चा करुन योग्य तो तोडगा काढला जाईल.

हेही वाचा – गोवा माईल्सचा निर्णय घेताना पर्रीकरांनी विश्वासात घेतलं नाही- मायकल लोबो

‘गोवा माईल्स’विरोधात उद्रेक! टॅक्सीचालकाला हणजूणमध्ये बदडले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!