POLITICS | केरळ विधिमंडळात सासरे-जावई एकत्र

केरळच्या विधिमंडळातील अनोखा राजयोग; पी.विजयन मुख्यमंत्री, तर पी.ए.मोहंमद रियाझ आमदार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः केरळमध्ये यंदा एक वेगळा योगायोग पाहायला मिळणार आहे. सासरे आणि जावई हे दोघेही विधिमंडळात एकत्र असतील. विशेष म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री पी.विजयन यांच्याचबाबतीत घडून आलं आहे. सासरे विजयन हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्यांचे जावई पी.ए. मोहंमद रियाझ हे देखील आमदारकीची शपथ घेतील. रियाझ हे डेमोक्रेटिक यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. रियाझ यांनी काही दिवसांपूर्वीच विजयन यांच्या कन्या वीणा यांच्याशी विवाह केला. ते स्वतः आयटी क्षेत्रातील बड़े उद्योजक असून बंगळूरमध्ये त्यांची स्वतःची कंपनी देखील आहे. यंदा विजयन हे कन्नूर जिल्ह्यातील धरमादम मतदारसंघातून पन्नास हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले असून रियाझ हे कोझीकोडमधील बेपोर मतदारसंघातून जिंकले आहेत. रियाझ हे स्वतः युवकांचे नेते असून त्यांनी 2009 मध्ये कोझीकोड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक देखील लढविली होती. पण ते त्यात पराभूत झाले होते.

यांना पराभवाचा धक्का

याशिवाय अन्य नेत्यांचा गोतावळा देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला होता. केरळ काँग्रेस (एम)चे अध्यक्ष जोस. के. मणी आणि त्यांच्या बहिणीचे पती एम. पी. जोसेफ हे पराभूत झाले. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष पी.जे.जोसेफ थोड्पुझ्झामधून विजयी झाले असून त्यांचे जावई डॉ. जोसेफ हे मात्र कोथामंगलममधून पराभूत झाले आहेत. माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची मुलंही मैदानात उतरली होती. काँग्रेस नेते के. मुरलीधरन आणि पद्मजा वेणुगोपाल यांनाही पराभव पत्कारावा लागला.

हेही वाचाः आरोग्य संचालनालयाकडून महत्त्वाचं पाऊल

विजयन यांचा राजीनामा

केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालीच डावी आघाडी सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर विजयन यांनी आज राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. आज दुपारीच विजयन यांनी राजभवन गाठ स्वतःचा राजीनामा राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांच्याकडे सादर केला अशी माहिती सूत्रांनी दिली. आता शपथविधी होईपर्यंत विजयन यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार असेल. विजयन हे पुढील आठवड्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!