७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती

निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना नो आयटी रिटर्न

७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी या अर्थसंकल्पात दिलासा देणारी बातमी आहे. ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आली आहे.

निर्मल सीतारमण यांचा तिसरा अर्थसंकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर झाला आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प होता. तसंच पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं असून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ‘मेक इन इंडिया’ टॅबचा वापर करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!