ईएसआय हॉस्पिटलमधील नर्सवर टांगती तलवार, तर डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी : मडगांव कोवीड हॉस्पिटलाच्या निवासी डॉक्टरांचा काम बंद आदोलनाचा इशारा. कोवीड काळात ते राहत असलेली हॉटेल्स खाली करण्याच्या सरकारी आदेशामुळे डॉक्टर नाराज. या पुढे डॉक्टरांना हॉटेलमध्ये राहायचं असेल तर त्यांनी स्वताच्या खिशातून पैशे द्यावेत असा अजब सल्ला सरकाराने दिलाय.
कोवीड 19 सारख्या कठीण काळात मडगांव इएसआय हॉस्पिटल आणि जिल्हा हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा आता काम बंद आंदोलनाचा इशारा. याचं कारण आहे राज्य सरकारच्या स्टेट एक्झिकेटीव्ह कमिनीनं डॉक्टरांना कोवीड काळात ते राहत असलेली हॉटेल्स खाली करण्यासंबंधी दिलेला आदेश.
स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीचा वादग्रस्त आदेश
– मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसईसी म्हणजेच स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी कार्यरत आहे
– कमिटीने कोविड 19 काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना ते राहत असलेली हॉटेल्स 1 नॉव्हेंबर रोजी खाली करण्याचा आदेश दिलाय
– डॉक्टरांना हॉटेलमध्येच राहायचं असेल तर यापुढे त्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे द्यावेत असा उलट सल्ला दिलाय
एसईसीने काढलेल्या या आदेशावर मडगाव ईएसआय आणि जिल्हा हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर संतापले. डॉक्टरांनी गोवा असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स, जी.ए.आर.डीला पत्र लिहून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय.
डॉक्टरांचे कामबंद आदोलनाच्या इशाऱ्याचे पत्र
– जीएमसीतून दररोज मडगाव प्रवासाच्या व्यवस्थेची अजून अधिकृत काहीच माहिती नाही
– पीपीई किटमध्ये कोविड 19 रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांना दूरचा प्रवास दमवणारा
– जोखमीच्या कामगिरीवर असलेल्या डॉक्टरांना सतत इमर्जन्सी कॉल्स. अशा डॉक्टरांना एक तासाच्या प्रवासामुळे तत्काळ सेवा देणे अशक्य
– मोठ्या प्रवासात रात्रपाळीनंतर इमर्जन्सी कॉल्स अटेंड करणं धोकादायक, खासकरुन महिला डॉक्टरांसाठी
– स्वत:च्या पैशातून हॉटेलचे पैसे भरण्याचा आश्चर्यकारक सल्ला. कोविड काळात मागील 5 महिने सेवा देणाऱ्या कित्येक डॉक्टरांचा पगारच नाही.
– सरकारने जर हा आदेश मागे घेतला नाही कर आम्हाला काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नाही
आरोग्यमंत्रीही चिडले, मुख्यमंत्र्याकडे ही केली मागणी
सरकारच्याच स्टेट एक्झिकेटीव्ह कमिटीच्या या आदेशाने आरोग्यमंत्री विश्वजीत राणेही चिडले आहेत. त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची चर्चा करुन डॉक्टरांच्या बाजुने आपली म्हणणं मांडला आहे. आरोग्य खात्याला अंधारत ठेवून असा निर्णय घ्यायलास्टेट एक्झिकेटीव्ह कमिटी समांतर सरकार आहे की काय असा संतप्त सवाल आरोग्यमंत्र्यांनी केलाय. तसेच आता ही समिती रद्द करण्याची शिफारसही राणेंनी मुख्यमंत्र्यांजवळ केलीय.
नर्सना तात्पुरता दिलासा, मात्र
ईएसआय हॉस्पिटलमधील कंत्राटी नर्सनाही हॉटेल सोडण्याचा आदेश देण्याक आला होता. इएसआय हॉस्पिटलमध्ये सुमारे 53 कंत्राटी नर्स काम करतात. कोवीड काळात सेवा देणाऱ्या या नर्सच्या रहाण्याची सोय सरकारने मडगांवतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये केली होती. त्यांनाही 1 नोव्हेंबर रोजी हॉटेल सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशावर नाराज नर्सनी हॉस्पिटलमधील वरीष्ठ डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर हॉटेल सोडण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय. मात्र त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. या नर्सना हॉस्पिटलमध्येच रहाण्याची केलेली सोय नर्सना मान्य नाही.