सोनू सूद दिसला मुख्यमंत्री केजरीवालांसोबत; राजकीय प्रवेशाच्या प्रश्नावर म्हणाला…

आप ने सुरू केला 'देश के मेंटर' कार्यक्रम; सोनू सूद ब्रँड एम्बेसिडर

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः करोना संकटात लॉकडाउनमुळे परप्रांतियांचे प्रचंड हाल झाले. अशावेळी अनेक नागरिकांच्या मदतीला अभिनेता सोनू सूद धावून गेला. यावरून महाराष्ट्रात राजकारणही रंगलं. पण सोनू सूदने त्याचं काम सुरूच ठेवलं. जनमानसात त्याची प्रतिमा ही अभिनेत्याच्याही वर म्हणजे ‘रियल हिरो’ अशी बनली आहे. यामुळे काही राजकीय पक्ष त्याच्याकडे डोळे लावून बसले. दिल्लीत आज अभिनेता सोनू सूद मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दिसल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. यावेळी सोनू सूदला पत्रकारांनी निवडणूक लढण्याबाबत आणि राजकीय प्रवेशावर प्रश्न विचारला.

हेही वाचाः तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना पूर्व प्राथमिक विभागात प्रवेश नाहीच!

सोनू सूद हा राजकीय प्रवेश करतोय की काय?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अभिनेता सोनू सूद त्यांच्यासोबत होता. यामुळे सोनू सूद हा राजकीय प्रवेश करतोय की काय? असा प्रश्न उपस्थितांना पडला. आम आदमी पार्टीत प्रवेश करणार आहे का? आणि ‘आप’कडून निवडणूक लढवणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी सोनू सूदला केला. त्यावर अतिशय चतुराईने त्याने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. ‘राजकारणावर चर्चा झाली नाही. हा आणखी एक मोठा मुद्दा आहे (देशाच्या मार्गदर्शकाशी संबंधित). मला वाटतं यापेक्षा मोठा मुद्दा असू शकत नाही, असं सोनू सूद म्हणाला.

काहीही राजकीय नाही. चांगलं काम करायचं असेल तर राजकारणात या, असं अनेक जण बोलतात. मी आम्ही कुठल्याही राजकीय मुद्द्यावर चर्चा केली नाही. आताचा मुद्दा हा त्याहूनही मोठा आहे, असं सोनू सूद म्हणाला.

हेही वाचाः गोवा-कर्नाटक म्हादई वादः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली कायदेशीर-तांत्रिक तज्ज्ञांची बैठक

सोनू सूदच्या राजकीय प्रवेशाच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले…

सोनू सूदसोबत आल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला. आम्ही कुठलीही राजकीय चर्चा केली नाही, असं केजरीवाल म्हणाले. यावेळी केजरीवाल यांनी सोनू सूदची कौतुक केले. सोनू सूद हा देशासाठी एक प्रेरणा आहे. देशात कुठे काहाही संकट आल्यावर कुणीही त्याच्याशी संपर्क करतो. सोनू सूद मदत करतो. सरकार जे करू शकत नाही, तो करिश्मा सोनू सूद करून दाखवतो, असं केजरीवाल म्हणाले.

हेही वाचाः आयएसआयएस आणि तालिबान का आहेत हाडवैरी ?

काय आहे ‘देश के मेंटोर’ कार्यक्रम?

‘देश के मेंटोर’ या कार्यक्रमासाठी ब्रँड एम्बेसिडर होण्यास सोनू सूद तयार झाला आहे. शक्यता नोव्हेंबरमध्ये हा कार्यक्रम लाँच होईल. दिल्लीत देश के मेंटोर हा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू होता. आता तो लाँच केला जाईल, असं केजरीवाल म्हणाले. ‘देश के मेंटोर’ या कार्यक्रमानुसार लहान मुलांना करिअरमध्ये कशा प्रकारे पुढे जाता येईल, यासंदर्भात मार्गदर्शक केले जाईल. यामुळे नागरिकांनी पुढे यावं आणि मुलांचं मेंटोर व्हावं, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

हेही वाचाः गोव्यातल्या युवकांचं सिंधुदुर्गातील रुग्णांना रक्तदान !

सोनू सूद म्हणाला…

दिल्लीत कशा प्रकारने शिक्षण क्षेत्रात बदल झाला आहे, हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. यामुळे दिल्ली सरकारच्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन सोनू सूदने केलं. तसंच आमच्यात राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही. हा राजकारणापेक्षाही मोठा मुद्दा आहे, असं अभिनेता सोनू सूद म्हणाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!