दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रचला इतिहास!

भगतसिंग यांची प्रेरणा घेऊन देशभक्तीपर अभ्यासक्रमाची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इतिहास रचला असल्याचे गौरवोद्गार आम आदमी पक्षाचे (आप) दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी काढले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भगतसिंगपासून प्रेरणा घेऊन देशभक्तीपर अभ्यासक्रम लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. ‘आप’च्या युथ विंगने मंगळवारी शहीद भगतसिंग यांचा 7 वा स्थापना दिवस आणि जयंती साजरी केली. केजरीवाल सरकारचा देशभक्तीपर अभ्यासक्रम शाळांमध्ये नवीन भगतसिंग तयार करेल असा विश्वास यावेळी गोपाल राय यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणले की आम्ही अशा तरुणांची एक पिढी निर्माण करू ज्यांना देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा उत्साह असेल.

संपूर्ण देश भगतसिंग यांचा वाढदिवस साजरा करत करत असताना देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील शेतकऱ्यांना भारत बंद करण्यास भाग पाडले गेले. या 15 वर्षांत भाजपने केवळ भ्रष्टाचार केले असल्याच ते म्हणाले.

‘आप’च्या युथ विंगने साजरा केला आपला स्थापना दिवस

शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त ‘आप’च्या युथ विंगने आपला स्थापना दिवसही साजरा केला. याच निम्मिताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली आणि देशातील मुलांना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या सारख्या क्रांतिकाऱ्याकडून प्रेरणे मिळावी या साठी देशभक्तीपर अभ्यासक्रम लागू करून अश्या पद्धतीचे अभ्यासक्रम लागू करणारे दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे. यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

हा अभ्यासक्रम दिल्लीच्या शाळांमधून नवीन भगतसिंग तयार करेल

मला खात्री आहे की हा अभ्यासक्रम दिल्लीच्या शाळांमधून नवीन भगतसिंग तयार करेल आणि अशा तरुणांची एक पिढी तयार करेल ज्यात या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना असेल. ज्यावेळी संपूर्ण देश भगतसिंगांचा वाढदिवस साजरा करत आहे, त्या वेळी देशातील शेतकऱ्यांना भारत बंदची हाक द्यावी लागली. भारताच्या इतिहासात चळवळींची प्रदीर्घ परंपरा आहे, परंतु देशात प्रथमच असे सरकार स्थापन झाले आहे ज्याला ना हृदय आहे ना मन आहे. ते कशाचाही विचार करायला तयार नाहीत. गेल्या वर्षी 7 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी थंडीत आंदोलन सुरू केले. चळवळीने उष्णता, पाऊस सहन केला. आता चळवळ नोव्हेंबर महिन्यात 1 वर्ष पूर्ण करेल याची आठवण गोपाल राय यांनी करून दिली.

आम्ही असे उद्दाम सरकार कधीही पाहिले नाही

गोपाल राय पुढे म्हणाले की, आम्ही असे उद्दाम सरकार कधीही पाहिले नाही. ब्रिटीश राजवटीत, विभाजित करा आणि राज्य करा हि नीती अवलंबण्यात आली होती. आज देशात पुन्हा एकदा असे सरकार स्थापन झाले आहे जे या देशाचे विभाजन करून राज्य करत आहे. भगतसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त मला शपथ घ्यायची आहे की आम्ही ही विचारधारा मोडून देशाला एकत्रित ठेवूया.

भगतसिंगांचे नाव घेतो, तेव्हा स्फूर्ती येते

जेव्हा आपण भगतसिंगांचे नाव घेतो, तेव्हा स्फूर्ती येते. भगतसिंगने फक्त एकदाच पिस्तूल चालवले. ब्रिटीश राजवटीतील विधानसभेत बॉम्ब फेकला, मात्र कोणीही दुखापत होऊ नये म्हणून रिकाम्या जागेवर फेकला. जेव्हा भगतसिंग तुरुंगात गेले, तेव्हा त्यांनी 63 दिवसांचे उपवास केले,हा इतिहास यावेळी गोपाल राय यांनी सांगितला.

‘आप’ची युवा शाखा सर्व पक्षांच्या युवा शाखेपेक्षा वेगळी

गोपाल राय म्हणाले की, ‘आप’ची युवा शाखा सर्व पक्षांच्या युवा शाखेपेक्षा वेगळी आहे. तुमच्या कुटुंबासाठीही जगा, पण जेव्हा तुम्हाला यापैकी काहीही निवडावे लागेल, तेव्हा, सर्वप्रथम, तुम्ही देशासाठी जगण्याची आवड निवडावी. इतर पक्षांचे लोकही राजकारण करतात आणि आपणही राजकारण करतो. पण ते द्वेषाचे राजकारण करतात, आम्ही प्रेमाचे राजकारण करतो. ते स्वतःसाठी सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करतात आणि आम्ही ते देशाचे नाव आणि प्रतिष्ठा उजाळा देण्यासाठी करतो. शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे स्मरण करून, आपण सर्वांनी या देशात नवीन कल्पना आणि नवीन ध्येय घेऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

भाजपचा 15 वर्षांचा कलंक पुसण्याची एमसीडीची निवडणूक ही आमच्यासाठी संधी

ते म्हणाले, एमसीडीचे ध्येय आपल्यासमोर आहे. एमसीडीची निवडणूक ही केवळ आमच्यासाठी नगरसेवक किंवा महापौर बनवण्यासाठी नाही. भारतीय जनता पक्षाचा 15 वर्षांचा कलंक पुसण्याची एमसीडीची निवडणूक ही आमच्यासाठी संधी आहे. या 15 वर्षांमध्ये भाजपने दिल्लीकरांना कचऱ्याच्या तीन पर्वत भेट दिल्या. कचऱ्याच्या डोंगराला सलाम केल्याशिवाय दिल्लीत प्रवेश करत नाही. ‘आप’ने हे कलंक मिटवण्यासाठी संघर्ष केला आहे.

दिल्लीतील भाजपच्या एमसीडीचा भ्रष्टाचाराचा कलंक मिटवावा लागेल

गोपाल राय म्हणाले, दिल्लीत बसलेल्या भाजपच्या एमसीडीचा भ्रष्टाचाराचा कलंक मिटवावा लागेल. त्यामुळे युवा आघाडीला हा मोर्चा सांभाळावा लागेल. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली देशाची राजधानी दिल्लीला जगातील सर्वात सुंदर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एक जूट होऊया.

एकजुटीने हा लढा पुढे नेऊ

युथ विंगने ज्या प्रकारे संपूर्ण दिल्लीच्या अंतर्गत भगत युवा परिषद आयोजित केली, ज्या प्रकारे हा काफिला मन लावून पुढे नेला गेला, आम्हाला आशा आहे की दिल्लीतील युवा शाखा आपले स्वतःचे रेकॉर्ड तयार करेल. आम्हाला खात्री आहे की ज्या मार्गाने आपण दिल्लीच्या बदलासाठी पुढे जात आहोत त्याच एकजुटीने हा लढा पुढे नेऊ आणि बदल घडवू असं गोपाल राय म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!