मांद्रेत ‘गोवा फॉरवर्ड’च्या दीपक कळंगुटकर यांचा शानदार प्रचार शुभारंभ !

युती झाली तरी दीपकच उमेदवार : विजय सरदेसाई

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : मैत्री दिनी गोवा फॉरवर्ड पक्षाने आमदार निवडून आणण्यासाठी मांद्रे मतदार संघातून प्रचाराला सुरुवात केली आहे. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे मतदार संघ गहाण ठेवला आहे. त्याला रोखण्यासाठी गोवा फॉरवर्ड कार्यरत आहे, असे प्रतिपादन, गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केलं. पार्से श्री भगवती मंदिर येथे मांद्रेचे गोवा फॉरवर्डचे उमेदवार दीपक कळंगुटकर यांच्या प्रचाराचा श्रीफळ ठेवून शुभारंभ केला. त्यावेळी ते स्थानिक पत्रकारांकडे बोलत होते.

यावेळी मांद्रेचे उमेदवार दीपक कळंगुटकर, उषा सरदेसाई, दुर्गादास कामत, पेडणेचे उमेदवार जितेंद्र गावकर, शेखर पार्सेकर, निलेश कलंगुटकर, पंच अरुण पार्सेकर, गणपत कळंगुटकर, श्री घाडगे आदी उपस्थित होते .

सुरुवातीला प्रथमच मांद्रे मतदार संघाचा दौरा करत असल्यामुळे नागरिकातर्फे शाल, श्रीफळ आणि तैलचित्र देवून आमदार विजय सरदेसाई यांचा माजी सरपंच गणपत कलंगुटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

भाजपाकडे सोयरिक नाहीच…
आमदार विजय सरदेसाई यांना पत्रकारांनी भविष्यात तुम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे युती करणार का, असा प्रश्न विचारला असता यापुढे कधीच भाजपाकडे युती करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

…त्यासाठी कळंगुटकर यांना संधी द्यावी

आमदार विजय सरदेसाई यांनी बोलताना, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे मतदार संघ गहाण ठेवलेला आहे, असा गंभीर आरोप केला. आमदारकी विकणाऱ्या आमदाराला परत जनता संधी देणार नाही. मतदार संघ विकण्याचे काम तुमच्या आमदाराने केले, आता गोवा वाचवण्यासाठी भूमिपुत्रासाठी जमिनी आणि गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल. त्यासाठी गोवा फॉरवर्ड गोवाभर जनजागृती करत आहे. गोवा गोवेकरासाठी राखून ठेवूया. सेंटर क्लोज होवून येतात त्याना मांद्रेत संधी नाही, त्यासाठी जे कोणी ग्रासरूटवरून येतात त्यांना संधी आहे आणि त्यासाठी दीपक कळंगुटकर यांना आमदार होण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले .

युती झाली तरी दीपकच उमेदवार
युती झाली तर मांद्रे मतदार संघ सोडणार का, या प्रश्नाला उत्तर देताना जर युती झाली तरीही युतीचा उमेदवार म्हणून दीपक कळंगुटकर असणार, तिथं कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पुनरुच्चार विजय सरदेसाई यांनी केला.

मांद्रेच्या आमदाराने एकतरी प्रश्न मांडला का?

आपण विधानसभेत आवाज केला, फातोर्डा मतदार संघातला एकही प्रश्न आपण मांडला नाही, कारण तिथ व्यवस्थित आहे. त्यामुळे इतर मतदार संघातील प्रश्न आपण घेतले. मात्र मांद्रेच्या आमदाराने आपल्या मतदार संघाचा एकतरी प्रश्न मांडला का? असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला .

भाजपाकडून सुटका हवी तर एकवट करूया
भाजपा सरकारने गोवा विकायला काढला आहे. मांद्रे मतदार संघ विकला गेला, तो आता सुरक्षित ठेवण्यासाठी दीपक कळंगुटकर यांना आमदार करायचे आहे. त्यासाठी भाजपातून सुटका मिळवण्यासाठी आता आम्ही एकवट करुया, असे आवाहन विजय सरदेसाई यांनी केले .

२०२२ ची निवडणूक २१ मधेही होवू शकते ?
विजय सरदेसाई यांनी बोलताना २०२२ ची निवडणूक २१ सालीही होवू शकते, असा दावा केला. आम्ही निवडणुकीची घाई करण्यामागचे कारण नाही तर भाजपवाले गोवा सावंतवाडीत विकणार असा दावा केला.

मोपा गेम्बलिंग झोनची गरज नाही ?
तुम्ही सत्तेत आलात तर मोपा गेम्बलिंग झोनविषयी काय भूमिका असेल, या प्रश्नाला उत्तर देताना मोपा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तिथ गेम्बलिंग झोनची गरज नाही. आज जो पणजीचा मॉडेल आहे तो हलवला तर पणजीचेही लोक झोपणार. अनेक राज्य आतुरलेली आहे कि गेमिंग झोन कसिनो इतरत्र न्यायला. त्यासाठी कायदे केलेले आहेत. जमिनीवर कसिनो आणण्यासाठी आणि आता मांडवीचे कसिनो हलवले तर त्याचा आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होणार. कोरोना काळात याचा खूप त्रास झाला.

डॉ. प्रमोद सावंत वर्षाला ३०० कोटी कर्ज घेतो
राज्य चालवण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ३०० कोटी कर्ज घेतो. त्यातले २५० कोटी रुपये हे पगारावर खर्च केले जातात. हे त्यालाही कळत नाही, म्हणून ते विधानसभेचे अधिवेशन तीन दिवसांनी संपवतात, असा आरोप त्यांनी केला .

दीपक कळंगुटकर यांना वाढता पाठिंबा

मांद्रेचे उमेदवार दीपक कळंगुटकर यांनी बोलताना ज्यावेळी आपण पक्षात गेलो, त्यावेळेपासून कामाला सुरुवात केली आहे. पक्षाला मतदार संघातून वाढता पाठींबा मिळत आहे. आज प्रचाराचा श्रीफळ ठेवला. भगवती देवीचा आशीर्वाद घेतला. आजच्या दिवशी मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. शिवाय टॅक्सी व्यवसाय, मांद्रे येथील होवू घालेल्या मनोरंजन सिटीवर चर्चा करण्यात येणार असल्याचे दीपक कळंगुटकर यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!