‘कोविड लस आणण्यात सरकारचं काहीही योगदान नाही’

पंतप्रधानांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन वादविवाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पंतप्रधानांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाआधी सभागृहात वादळी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोना काळात पंतप्रधानांनी कसं चांगलं काम केलं, याचा अभिनंदन प्रस्ताव अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये आणण्यात आला होता. त्यावेळी विजय सरदेसाईंनी महत्त्वाचं विधान केलंय.

कोविड लस आणण्यात सरकारचं कोणतंही योगदान नसून, हे काम ऑक्सफर्ड आणि सीरमने केलेलं आहे. त्याचं क्रेडीट सरकारनं घेऊ नये, असं विधान विजय सरदेसाईंनी केलं आहे. त्याचप्रमाणे कोरोना लसीबाबत फोल विश्वास देण्याचा प्रयत्न करु नये, असही त्यांनी म्हटलंय.

घमासान

विजय सरदेसाई बोलत असतेवेली वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यासोबत जुंपली होती. कोरोना महमारीवर बोलत असताना नीलेश काब्राल यांच्या बोलण्यावर दिगंबर कामत यांनीही आक्षेप घेतला. तसंच सुदिन ढवळीकरही यावेळी आक्षेप नोंदवण्यासाठी उभे राहिल्याचं पाहायला मिळालं. प्रचंड संतापलेल्या नीलेश काब्राल यांनी यावेली विजय सरदेसाईंच्या वक्तव्यांवर कडाडून टीका केली.

आमदारांना लस द्या

सरकारनं ४० आमदारांना लस देऊन लोकांमध्ये लसीकरणाबाबत विश्वास द्यावा, अशी मागणी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणंही महत्त्वाचंय. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी हे पाऊल उचलावं, असं आवाहन खंवटे यांनी केलंय.

गुदिन्होंनी सुनावलं

कोरोना काळात सरकारनं उत्तम कामगिरी बजावल्याचं मॉविन गुदिन्हो यांनी म्हटलंय. कोरोना लसीची पहिली गरज ही कोरोना फ्रंटलाईन वॉरीयर्सलाच असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मोदी सरकारसोबतच गोवा सरकारनंही कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. आमदारांपेक्षाही लसीची गरज ही फ्रंटलाईनमध्ये काम करणाऱ्या वॉरीयर्सला जास्त असल्यानं लसीवर त्यांचा आधी हक्क असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सरकारनं प्रत्येक वेळी योग्य ते निर्णय घेतल्याचाही पुनरुच्चार केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!