मिलिंद सोमण 55 वर्षाचे झाले! त्यांचा बीचवरचा नग्न फोटो पाहून गिरीश चोडणकर म्हणाले…

पूनम पांडेचा व्हिडीओ वायरल झाल्यानं सोमणांचा मिलिंद चर्चेत

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : मिलिंद सोमण फिटही आहेत आणि हिटही. फिटनेसचा मंत्र देणारे मिलिंद सोमण 55 वर्षांचे झाले. त्यांनी स्वतःच स्वतःला इन्टाग्रामवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सोबत एक फोटो टाकलाय. या फोटोत ते नेहमी त्यांना आवडणारी गोष्ट करताना दिसले. अर्थात ते धावत होते. पण धावताना त्यांनी अंगावर एकही वस्त्र परिधान केलं नव्हतं. यावरुन काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांनी भाजपवर निशाणा साधलाय.

चोडणकरांनी का केली टीका?

फार दिवसांची गोष्ट नाही. पूनम पांडेचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ अश्लिल होता, हे वेगळं सांगायला नको. नावावरुन तुमच्याही ते लक्षात आलं असावं. काणकोण धरणावर शूट झालेल्या या व्हिडीओमुळे काँग्रेसने सवाल उपस्थित केले. गिरीश चोडणकरांनी सर्वप्रथम भाजपवर निशाणा साधला. ‘काणकोण धरणावरील अश्लिल व्हिडीयोतून सिद्ध झालं भाजपा पोर्न माफियाला प्रोत्साहन देतंय’, असा आरोप त्यांनी केलाय.

फोटोमुळे आगीत तेल?

पूनम पांडे व्हिडीओप्रकरणानंतर मिलिंद सोमणांचा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. त्यात काँग्रेसही आलीच. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कुणाचंही नाव न घेता अप्रत्यक्षपणे भाजपवर तोंडसुख घेतलंय. या अश्लिल आणि आक्षेपार्ह गोष्टींना कोण प्रोत्साहन देतंय, असा थेट सवाल गिरीश चोडणकर यांनी विचारलाय. गोवा सरकार, भाजप, प्रमोद सावंत यांनाही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये टॅग केलंय. मात्र त्यांनी कुठेच पूनम पांडे आणि मिलिंद सोमण यांचं नाव घेतलेलं नाही. पॉर्न माफियाला कोण सपोर्ट करतंय, असं म्हणत त्यांनी गोवा सरकारवर टीका केलीय.

हॅपी बर्थडे मिलिंद सोमण

हा वाद तूर्त सुरु राहिलच. पण त्यात मिलिंद सोमण यांना बर्थडे विश करायला विसरुन चालणार नाही. हॅपी बर्थडे मिलिंद सोमण. श्लिल आणि अश्लिल यात एक बारीक रेघ असते. न्यूड सिनेमातून रवी जाधव यांनी त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मिलिंद सोमण यांची गळ्यात अजगर घेऊन केलेली जाहिरात तुम्ही विसरला तर नाहीत ना? शिवाय १९९१मध्येही मिलिंद सोमण यांनी न्यूड फोटोशूट केलं होतं. सोमण यांच्या वाढदिवसाच्या फोटोमुळे एक प्रश्न नक्कीच प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. पॉर्न स्टार आणि आर्टीस्ट यांना आपण एकाच नजरेतून पाहणार आहोत का?

या प्रश्नाचा विचार करा. तोवर मिलिंद सोमण आधीही सांगितल्याप्रमाणे हिट आणि फिट होते. नेहमी राहतील, आणि राहावेत, या त्यांना शुभेच्छा!

बायकोनं दिलेल्या शुभेच्छाही वाचा

हेही वाचा –

‘काणकोण धरणावरील अश्लिल व्हिडीयोतून सिद्ध झालं भाजपा पोर्न माफियाला प्रोत्साहन देतंय’

‘पवार’फुल्ल भेट! कामत शरद पवारांना भेटले, भेटीत ‘चाय पे चर्चा’

‘बबडो नालायक असा’, वेंगुर्ल्याच्या मालवणी आजींची बबड्यावर आगपाखड

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!