इनकमिंग आऊटगोईंग जोरात! ज्योकिम आणि युरी आलेमाव यांनी पुन्हा धरला काँग्रेसचा ‘हात’

कुणाची ताकद वाढणार? कुणाची कमी होणार?

अजय लाड | प्रतिनिधी

सासष्टी : काँग्रेस हात सोडलेल्या दोघा नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा हात हातात घेतलाय. ज्योकिम आणि युरी आलेमाव यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात इनकमिंग-आऊटगोईंग जोरात सुरु आहे. अशात या महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चांना ऊत आलाय.

पुन्हा हात हाती…

ज्योकिम आणि युरी आलेमाव हे याआधी काँग्रेस पक्षातच होते. काँग्रेस पक्ष सोडून युरी आलेमाव हे गोवा फॉरवर्ड होते. त्याआधी त्यांनी २०१७ साली सांगेमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. तिथे काही त्यांना विजय मिळू शकला नव्हता. अखेर आता पुन्हा आलेमाव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय.

कुणाचा फायदा?

ज्योकिम हे सध्याचे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांचे बंधू. त्यांनीही राष्ट्रवादी घड्याळ सोडून आता काँग्रेसचा हात हातात धरलाय. विरोधी पक्षनेते आणि मडगावचे आमदार दिगबर कामत यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं नेमका कुणाला फायदा होतो आणि कुणाचं नुकसान होतं, हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र तूर्तास निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे प्रवेश गोयकरांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत.

आप भाजपची बी टीम?

दुसरीकडे मात्र गिरीश चोडणकर यांनी पंचवीस ते तीस नवे चेहर निवडणुकीत दिसतील, असं वक्तव्य केलंय. तसंच आप ही भाजपची बी टीम असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!