‘मला कुणालाही त्रास द्यायचा नाहीये, चर्चा करुन विकासाला पाठिंबा द्यावा’

मुख्यमंत्र्यांचं मेळावलीवासियांना आवाहन

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

ब्युरो : सचिवालयातील महत्त्वपूर्ण घडामोडींनंतर मुख्यमंत्र्यांनी आयआयटीवर महत्त्वाचं विधान केलं आहे. गोवनवार्ता लाईव्हने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आयआयटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे. लोकांनी चर्चा करावी आणि विकासाला पाठिंबा द्यावा, असं वक्तव्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं आहे. आयआयटीविरोधात मेळावलीतील लोकांना आता इतर ग्रामस्थांचाही पाठिंबा वाढतोय. त्या पार्श्वभूमीवर सचिवालयात मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकारी आणि आयजींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून लोकांनी चर्चेसाठी पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. इतर गावातील लोकांनाही आम्ही एवढंच सांगू इच्छितो की त्यांनीही विकासाला सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं म्हटलंय. त्याचप्रमाणे लवकरच आरेखनाच्या कामालाही सुरुवात केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.

स्वातंत्र सैनिकांबाबतही चर्चा

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. मात्र काही कुटुंबीयांच्या घरात एकापेक्षा जास्त जणांना सरकारी नोकरी देण्यात आलेली आहे. त्यावर आता काहीही करता येऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुबीयांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या असून, त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलंय.

पाहा व्हिडीओ-

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!