VIDEO | मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ Reel, मिर्झापूरचं म्युझिक आणि ‘झाला गोव्याचा मिर्झापूर!’

टीएमसीला टोला लगावताना मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : बातमी आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या एका रिलची. डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन एक रिल पोस्ट करण्यात आली आहे. या रिलमध्ये मुख्यमंत्र्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार याचा दावा केला आहे. त्यासोबतच टीएमसीलाही नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टोला लगवालय. पण या चर्चा रंगली आहे, ती या रिलमध्ये वापरण्यात आलेल्या बॅकग्राऊंड म्युझिकची!

मुख्यमंत्री मिर्झापूरच्या प्रेमात?

मिर्झापूर वेबसीरिज तर तुम्हाला माहीत असेलच! मिर्झापूरचा दुसरा सीझनही रीलिज झाला आहे. तिसऱ्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. पण आता मुख्यमंत्र्यांनी जे रिल रीलिज केलंय, ते गाजतंय. कारण या रीलमध्ये मुख्यमंत्र्यांनी मिर्झापूरचं म्युझिक वापरल्यानं चर्चांना उधाण आलंय.

27 जागा जिंकणार?

ट्वेन्टी टू इन ट्वेन्टी ट्वेन्टी टू असं ध्येय भाजपनं ठेवलं आहे. पण भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमात संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी २७ जागाही निवडून येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. टीएमसीच्या गोव्यात झालेल्या एन्ट्रीमुळे ही किमया साधता येणं शक्य असल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. त्याचं रील करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या इन्टाग्रामवर पोस्ट केलंय.

यातील काहींनी या रीलवर मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलंय. तर काहींनी गोवा मिर्झापूर झाल्याची टोलाही लगवालाय. १३ तासात २ हजारपेक्षा जास्त लोकांनी हे रील लाईक केलं होतं. हे रील तुम्ही पाहिलं की नाही?..

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!