बैठक पुढे ढकलली म्हणून मग भाजप नेत्यांची विमानतळावरच शहांसोबत धावती भेट

आगामी निवडणुकीबाबत नेमकी काय खलबतं?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सिंधुदुर्गात कार्यक्रम होता. त्यानंतर ते गोव्यात भाजपच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेणार होते. पण उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे त्यांनी दौरा आटोपता घेतला. पाहा नेमकं काय झालं उत्तराखंडमध्ये? महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या लाईफलाईन या हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर लगेचच परतीचा मार्ग धरला. दरम्यान, यावेळी कुडाळवरुन गोव्यात हेलिकॉप्टरने दाखल झाल्यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी विमानतळावर अमित शहांची भेट घेतली.

या धावत्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नाही. तूर्तास कोअर कमिटीची बैठक जरी पुढे ढकलली असली तर अमित शहांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

मुख्यमंत्रीही अमित शहांसोबत सिंधुदुर्गात कार्यक्रमासाठी हजर होते. त्यामुळे या संपूर्ण प्रवासातही त्यांची सविस्तर चर्चा झालीच असणार. दरम्यान, विमानतळावर उतरल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तानावडे, प्रभारी सीटी रवी, मंत्री मॉविन गुदिन्हो इत्यादी भाजप नेते अमित शहांना भेटलेत. या भेटीत नेमकी काय धावती चर्चा झाली, यावरुन तर्क लढवले जात आहेत.

हेही वाचा – BJP | मतभेद बाजूला ठेवा – पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना नेत्यांचा कानमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!