वाढदिवस विशेष! प्रतापसिंग राणे ५० वर्ष आमदार, १८ वर्ष मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : गोमंतकीय राजकारणातील पितामह म्हणून ओळखले जाणारे प्रतापसिंग रावजी राणे यांचा आज ८२वा वाढदिवस. पर्ये मतदारसंघात निर्विवाद वर्चव राखलेल्या राणेंची कारकीर्द मोठी आहे. दरम्यान, सकाळीच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या पदांवर काम केलंय आणि एकूणच त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती, त्यावर एक नजर टाकुयात….
गोव्यासाठी योगदान
कदंब वाहतूक महामंडळ
गोवा विद्यापीठ
कला अकादमी गोवा
गोवा पर्यटन विकास महाममंडळ
गोवा औद्यागिक वसाहती
औद्योगिक प्रशिक्षण संस्था
ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालयं
जलसिंचनाचे प्रकल्प
ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा
पक्क्या आणि रुंद रस्त्यांचे जाळं
वेर्णा औद्योगिक वसाहतीची उभारणी
नेहरु स्टेडियम, फातोर्डा
२४० खाटांचे आयडी हॉस्पिटल, फोंडा
गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट
इंटरनॅशनल सेंटर गोवा
हॉलेट मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट, पर्वरी
टाटा ग्रुपची पंचतारांकीत हॉटेल्स
साखळी महाविद्यालय
गोवा विधानसभा संकुलाची उभारणी
भव्य चोगम इव्हेंट
अंजुणा धरण
रवींद्र भवन, साखळी
गोव्याच्या औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणून प्रतापसिंग रावजी राणे यांच्या पाहिलं जातं. प्रतापसिंग राणे हे आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपल्या हितचिंतकांना, मित्रपरिवाला भेटत असतात. मात्र सध्या ते कोरोनातून बरे होते आहेत. त्यामुळे आज त्यांनी भेटी घेणं टाळलंय. शुभेच्छा आणि प्रार्थना हीच आपल्यासाठी सर्वोत्तम भेट ठरेल, असं त्यांनी म्हटलंय.