मोठी राजकीय बातमी! अखेर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला

पुन्हा एकदा गिरीश चोडणकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी काँग्रेसच्या वर्तुळातून एक महत्त्वाच बातमी हाती आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठरत नसलेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा तिढा अखेर सुटला आहे. पुन्हा एकदा गिरीश चोडणकर यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. त्यामुळे गिरीश चोडणकर हेच यापुढे पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेकांची नावं चर्चेत होती. गिरीश चोडणकरांची उचलबांगडी होण्याची चर्चा देखील वेगवेगळ्याप्रकारे समोर येत होती. अखेर गिरीश चोडणकरांच्याच नावावर पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

दुसरीकडे विधिमंडळ नेते म्हणून दिगंबर कामत यांचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे. तर आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं आहे. पी चिंदबरम यांच्या दौऱ्यानंतर तत्काळ हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख म्हणून रेडनाल्ड यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर लुईझिन फालेरो हे निवडणूक समन्वय समितीचे अध्यक्ष असणार आहे. तर फ्रान्सिस सार्दिन यांच्या वित्त समिती प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली असून ऍड. रमाकांत खलप हे जाहिरनामा समितीचे अध्यक्ष म्हणून यापुढे काम पाहतील. आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेस हायकमांडकडून करण्यात आलेले हे बदल भविष्यात कशा पद्धतीनं काम करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!