गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची भूपेंद्र पटेल आज घेणार शपथ

केंद्रीय मंत्र्यांसह अनेकांची राहणार उपस्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

गांधीनगर: भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. ते आज १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप भाजपकडून कुठलीही माहिती दिली गेली नसल्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. दरम्यान, रविवारी रात्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यपालांची राजभवनात भेट घेतली.

हेही वाचाः श्रीपाद नाईक यांच्याकडे गोव्याचे नेतृत्व शक्य ?

गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक

गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या एक वर्ष आधी केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेवरून विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, असं सूत्रांनी सांगितलं. गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप राज्यातील शक्तिशाली पटेल समाजाला खूश करण्याचे प्रयत्न करत आहे. रूपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाने भूपेंद्र पटेल यांची एकमताने नेते म्हणून निवड केली. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत. राज्यात सुरू असलेली विकासकामे पुढे नेली जातील. सर्वांना सोबत घेऊन काम करेन, असं भूपेंद्र पटेल म्हणाले.

त्यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाची घोडदौड यापुढेही सुरूच राहील

गुजरात भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाची घोडदौड यापुढेही सुरूच राहील. राज्याच्या विकासाला नवी ऊर्जा आणि वेग मिळेल. सुशासन आणि लोककल्याणात गुजरात कायम आघाडीवर राहील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

हेही वाचाः गोव्यात ‘नवं’ कापणीचा उत्साह !

भूपेंद्र पटेल यांचा परिचय

भूपेंद्र पटेल गुजरातच्या पाटीदार समाजाचे नेते आहेत. पाटीदार समाजात त्यांची मोठी पकड आहे.
‘जमिनीशी जुळलेला नेता’ अशी त्यांची ओळख आहे. भाजपसाठी पटेल मतदारांना सांधण्यात ते यशस्वी होऊ शकतात. अहमदाबादच्या शिलाज भागात राहणारे भूपेंद्र पटेल यांनी सिव्हील इंजीनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही.
भूपेंद्र पटेल माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे अतिशय निकटवर्ती मानले जातात. आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांनी निवडणूक लढवली होती. भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही होते.

हा व्हिडिओ पहाः BUNJEE JUMPING | कोविड निर्बंध पाळून बंजी जंपिंगचा थरार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!