ब्लॅक फंगसला महामारी घोषित करा, औषधांचा साठाही उपलब्ध करा

सोनिया गांधींचं मोदींना पत्रं; ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्याची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात ब्लॅक फंगसचा कहर वाढत आहे. अशावेळी बाजारात ब्लॅक फंगसच्या औषधांचा पुरेसा साठा नाहीये. त्यामुळे या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. तसंच ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचाः केअर अँड कॉम्पॅशनमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

ब्लॅक फंगसला महामारी घोषित करा

सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. केंद्र सरकारने ब्लॅक फंगस महामारी घोषित करावी. हा आजार झालेल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत. तसंच या आजाराचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. एम्फोटेरिसिन-बी हे औषध ब्लॅक फंगसवर उपयुक्त आहे. परंतु, सध्या बाजारात या औषधाची कमतरता आहे. त्यामुळे हे औषध मिळण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्यात यावीत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

‘त्या’ मुलांची जबाबदारी घ्या

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून सोनिया गांधी वारंवार मोदींना पत्रं लिहून अनेक सूचना करत आहेत. ज्या मुलांनी कोरोनामुळे आई किंवा वडिलांना गमावलं. किंवा दोघांनाही गमवालं. अशा मुलांना नवोदय विद्यालयात मोफत शिक्षण देण्याचा विचार करण्याचं आवाहन सोनिया यांनी नुकतंच मोदींना केलं होतं. या मुलांना शिक्षण देणं राष्ट्र म्हणून आपली जबाबदारी आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचाः स्पेशल टास्क फोर्समध्ये ‘या’ व्यक्तींचा समावेश

जुलैपासून ब्लॅक फंगस औषधाचा अधिक साठा

दरम्यान, ब्लॅक फंगसवर उपयुक्त असलेल्या एम्फोटेरेसिन-बी औषधाच्या उत्पादनासाठी आणखी पाच कंपन्यांना लायसन्स दिलं आहे. जुलैपासून दर महिन्याला या औषधांचे 1,11,000 डोसचं उत्पादन सुरू होईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारीच स्पष्ट केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!