भाजप खोटा प्रचार करतंय, भाजप आणि गोवा फॉरवर्डचा अनुभव घेऊन आलेले, किरण कांदोळकरांची टीका


खोट्या प्रचाराविरोधात भाजपवर टीएमसीनं डागली तोफ

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी – भाजप सोडून गोवा फॉवर्डमध्ये गेलेल्या किरणकांदोळकरांनी भाजपवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. गोवाफॉरवर्डआधी भाजपात असलेल्या आणि भाजपात राहून बंडखोरीकरणाऱ्या किरण कांदोळकरांनी गंभीर आरोप करत भाजपवर सडकूनटीका केली आहे. भाजपकडून टीएमसीविरोधात खोटा प्रचार केलाजात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ममता बॅनर्जी यांची प्रतिमामलिन करण्यासाठी भाजपकडून खोटा प्रचार केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

भाजपच्या या कृतीविरोधात टीएमसीनं तीव्र निषेध केलाय. हिंदूविरोधीपक्ष म्हणून प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार होतअसल्याचा आरोपही यावेळी टीएमसी नेत्यांनी भादपवर केलाय. ‘टीएमसी’ ने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप ) सोबत युतीकेल्याच्या पार्श्वभूमीवर ,गोवा तृणमूल काँग्रेस नेते किरण कांदोळकर, यतीश नाईक,प्रिया राठोड आणि  जयेश शेटगावकर यांनी भाजपच्याखोट्या प्रचाराचा भांडाफोड केला. यावेळी आयोजित करण्यातआलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपवर घणाघाती टीका

भाजपच्या अपमानास्पद टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, किरण कांदोळकर म्हणाले की, 

भाजप ‘AITC’ अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्यासाठीखोट्या प्रचाराची फॅक्टरी चालवतेय.ममत बॅनर्जी स्वतः एकापुजाऱ्याची कन्या तर आहेतच. शिवाय त्या एक सच्चा आणिधर्माभिमानी ब्राह्मण हिंदू आहेत. त्यामुळे गोव्यातील जनतेनं भाजपच्याखोट्या व्हिडीओच्या फंदात पडू नये.

‘बंगालमधील हिंदूंनी नेहमीच श्रीमती ममता बॅनर्जींना पाठिंबा दिलाआहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नकरूनही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘टीएमसी’नेभाजपवर जोरदार विजय मिळवला,”  असंही किरण कांदोळकर म्हणाले.

‘टीएमसी’ने ‘मगोप’सोबत केलेल्या युतीमुळे भाजप अस्वस्थ आणिनाराज झाली असल्याचंही ते म्हणालेत. पर्रीकरांनंतर आपला चेहरागमावलेल्या भाजपने जातीय कार्ड खेळण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही कांदोळकर यांनी केली. 

भाजपच्या विश्वासार्हतेवरही किरण कांदोळकर यांनी संशय उपस्थित केला. ते म्हणाले की,…

‘केंद्रातील भाजप देशाच्या हितासाठी काम करण्यात अपयशीठरल्याने त्यांनी ‘टीएमसी’ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहेज्याला देशभरातून प्रचंड पाठिंबा आणि मान्यता मिळत आहे. त्यांनीहिंदूंची काळजी घेतली असती, तर त्यांनी निदान हिंदूंसाठी काम तरीकेले असते. तुम्ही किती हिंदूंना रोजगार दिला? किती हिंदूंना तुम्हीचांगल्या पायाभूत सुविधा किंवा स्वस्त पेट्रोल दिले ?’

भाजपनं काढलंय हिंदू-मुस्लिम कार्ड

गोवा तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  यतीश नाईक म्हणाले की…

गोमंतकीय हुशार आहेत आणि ते भाजपकडून फसवले जाणार नाहीत. ‘गोव्यात ‘टीएमसी’चा चेहरा कोण? गोवावाशीय . मग बंगालबाबतभाजपचा डन्का  का चालला आहे? तुम्ही किती लोकांना नोकऱ्यादिल्या? भाजपला रोजगार, महागाई, सार्वजनिक पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी हे प्रश्न सोडवता आलेले नाहीत आणि त्यामुळे तेस्वस्तात हिंदू-मुस्लिम खेळ खेळत आहेत.’

ममता बॅनर्जी म्हणजे वाघिण

गोव्यातील ‘टीएमसी’च्या नेत्या प्रिया राठोड यांनी म्हटलंय की…

वारंवार प्रयत्न करूनही लोकांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रचारगोव्यात यशस्वी होणार नाही. ‘भ्रष्ट भाजप सरकार ‘चा खोटा प्रचारयशस्वी होणार नाही, कारण ते आता तरुणांना फसवू शकत नाहीत. हे21 वे शतक आहे आणि लोकांना शिक्षण, बेरोजगारी आणि चांगल्यापायाभूत सुविधांची गरज आहे, धर्मावर आधारित राजकारण नाही,’ 

गोव्याचा आवाज असण्याचे आणि गोव्यातील भाजप सरकारच्याकुशासनावर प्रकाश टाकण्याच्या गोवा ‘टीएमसी’च्या वचनाचापुनरुच्चार करताना, राठोड यांनी सांगितले की ‘वाघीण ‘  ममता बॅनर्जीयांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशभरात ‘टीएमसी’चे झेंडे फडकवले जातील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!