‘त्या घडामोडीनं शिक्कामोर्तब झालं, की होय! भाजपलाही म्हापशात बदल हवाय’

आप नेते राहुल म्हांबरे यांचा जोशुआ डिसोझांवर निशाणा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो – जोशुआ डिसोझा म्हापसाश्यात अपयशी ठरल्याचे भाजपनेही मान्य केल्याचं म्हणजे आप नेते राहुल म्हांबरेयांनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजपच्या नेत्यांनी केलेल्याटीकेमुळे निघालेले राजकीय अर्थ काय आहेत, याबाबत आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांची जोशुआ डिसोझांचीआगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जागा निश्चित नसल्याचं वक्तव्य केलंय.  

भाजपचे कार्यकारिणी सदस्य संदिप फळारी यांनी अलीकडेचत्यांच्याच पक्षाचे नेते, आणि म्हापसाचे  आमदार जोशुआ डिसोझायांच्या विरोधात विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा आधार घेत राहुल म्हांबरे यांनी म्हापशाला बदल हवा आहे हे सिद्ध होतं, असं प्रतिपादन केलंय.

जोशुआ म्हापसामध्ये अयशस्वी ठरल्याचे आता भाजपनेही मान्य केलंय, असंही त्यांनी म्हटलं.  

आणखी काय म्हणाले राहुल म्हांबरे?

म्हापसा भ्रष्टाचार आणि गैरकारभारामनं व्यापून गेला आहे. अनेकजणमुलभूत सुविधांपासून वंचित आहेत मात्र नगरसेवकाची भरभराट होते. म्हापसा बदलासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे, असं सांगूनआपने निवडणुकीपूर्वी म्हापसा येथे घरोघरी प्रचार आणि परिवर्तनयात्रा तीव्र केली होती.  या यात्रेला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय, असा विश्वासही म्हांबरे यांनी व्यक्त केलाय.

भाजपचे कार्यकारिणी सदस्य आणि मापसाचे माजी आमदार दिवंगतफ्रान्सिस डिसोझा यांचे कट्टर समर्थक संदिप फळारी यांनी स्वत: राज्यआणि केंद्रीय नेतृत्वाला या समस्येकडे लक्ष देण्याची आणिमापसासाठी नवीन उमेदवार शोधण्याची विनंती केली होती, अशीमाहितीही राहुल म्हांबरेंनी दिली. पुढे ते असंही म्हणाले की,… 

 “फळारी यांच्या नुकत्याच झालेल्या वक्तव्यावरून आता सर्वांनाचम्हापसेकरांच्या इच्छा आणि त्यांच्या हेतूची कल्पना येत असल्याचेस्पष्ट होते. पण आता उशीर झाला आहे; म्हापसेकरांनी नव्याचेहऱ्याला आणि नव्या पक्षाला संधी देण्याचे आधीच ठरवले आहे. त्यांनी हे दोन्ही पाहिले आहे. २४ तास पाणीपुरवठा होत नाही. म्हापसासीवरेज प्लांट सुरू करण्यात ही आमदारांना अपयश आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!