‘या’ पक्षाने सुरू केली ‘गोवन्स अगेन्स्ट करोना’ मोहीम

स्वयंसेवकांचे सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण : ताळगावमध्ये 50 ऑक्सिमित्रांच्या पहिल्या तुकडीने सुरक्षा आणि सर्वोत्कृष्ट अभ्यास प्रशिक्षण घेतले.

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षाने ‘गोवन्स अगेन्स्ट करोना’ ही मोहीम सुरू करताना स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणाकडेही विशेष लक्ष दिले आहे. ताळगावमध्ये 50 ऑक्सिमित्रांच्या पहिल्या तुकडीचे सुरक्षा आणि सर्वोत्कृष्ट अभ्यास प्रशिक्षण घेतले. ते ऑक्सिमीटरने सज्ज आहेत. आणि ‘गोअन्स विरुद्ध करोना’ उपक्रमांतर्गत तळागाळांत कार्य करू लागले आहेत.

घरोघरी जाऊन नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी स्वयंसेवकांना अचूक निदान व ऑक्सिमीटर वापरण्याच्या सर्वांत सुरक्षित पद्धती आणि सामाजिक अंतर राखून तपासणी कशी करावी याबद्दल प्रशिक्षण दिले गेले आहे.

प्रशिक्षणातील सुरक्षा उपाय

  • स्वतःचे हात स्वच्छ करणे आणि नंतर संरक्षणात्मक हातमोजे घालणे.
  • चेहर्‍याला संरक्षक मुखवटा घालणे
  • प्रत्येक व्यक्तीसमोर उपयोग करण्यापूर्वी ऑक्सिमीटर स्वच्छ करणे
  • परीक्षण सुरू करण्यापूर्वी व्यक्तीचे हात स्वच्छ करणे.

स्वयंसेवक या उपक्रमाबद्दल उत्साही होते, थिवी येथील स्वयंसेवकांपैकी एकाने सांगितले की, या कामात मदत केल्याने आपल्याला आनंद झाला आहे. कारण यामुळे सहकारी गोवेकरला मदत होईल. करोनाबद्दल सामान्य लोकांमध्ये भीती व गैरसमज आहेत, ही क्रिया त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल व गोवेकर या लढाईत एकटे नाहीत हेही त्यांना कळेल, असेही थिवीतील एक स्वयंसेवक म्हणाला.

करोनाविरुद्धच्या या उपक्रमात ऑक्सिमित्र हे गोवेकरांचे मजबूत आधारस्तंभ आहेत. हा उपक्रम गोव्यातील लोकांनी आपच्या माध्यमातून गोव्यातील लोकांसाठी राबवला आहे. प्रत्येक ऑक्सिमित्राला हार्दिक शुभेच्छा, मी त्यांच्या धैर्याला आणि वचनबद्धतेला सलाम करतो, संकटात आपल्या लोकांसाठी उभे राहणे हे शौर्य करण्यापेक्षा कमी नाही.
– राहुल म्हांबरे, प्रभारी, ‘गोवन्स अगेन्स्ट करोना’

काही दिवसांत आणखी स्वयंसेवक आमच्याबरोबर प्रशिक्षणासाठी सामील होतील. लवकरच 400पेक्षाही अधिक ऑक्सिमित्र गोवेकरांच्या सेवेसाठी मैदानात उतरतील.
– एल्विस गोम्स, आप गोवा प्रदेश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.