सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासह ‘हे’ 8 आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ; असे आकार घेईल कॅबिनेट

सिद्धरामय्या पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणार आहेत आणि डीके शिवकुमार त्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट 20 मे : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी रंगलेल्या नाटकाच्या अनेक अंकानंतर शेवटी सिद्धरामय्या आज शनिवारी (20 मे) कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. याशिवाय 8 आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि नेत्यांना निमंत्रित केले आहे. आज कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांसमोर 8 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यांमध्ये कोणाचा समावेश आहे ते पुढे सविस्तर पाहू

Karnataka CM Oath Ceremony LIVE: Siddaramaiah, Shivakumar to be sworn in  today, eight Ministers likely to take oath as well - The Economic Times

यांना मंत्रीपदी आरुढ होण्याची संधी

जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खरगे, रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांचा मंत्रिपदाची शपथ घेणार्‍या आठ आमदारांचा समावेश आहे. जी परमेश्वर गंगाधरैया हे कुनिगल तालुक्यातील अमृतुरु होबळी येथील हेब्बालू गावचे आहेत.एम.बी.पाटील हे रामनगर जिल्ह्यातील मगडी तालुक्यात आहेत. 1989 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी तुमकूरला गेले होते तेव्हा जी परमेश्वरा कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (KPCC) सहसचिव म्हणून पक्षात सामील झाले होते. 

Karnataka Swearing-In-Ceremony: Congress Invites Like-Minded Parties;  Mamata Banerjee, KCR Among Invitees | India News | Zee News

जी परमेश्वर

एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडी(एस) युती सरकारमध्ये परमेश्वरा हे राज्याचे पहिले दलित उपमुख्यमंत्री होते आणि ते 6 वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी मधुगिरी येथून 1989, 1999 आणि 2004, कोरटागेरे 2008, 2018 आणि 2023 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली आहे. दीर्घकाळ कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष राहण्यासोबतच त्यांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्रीपदेही सांभाळली आहेत. 

अगर दलित डिप्टी CM नहीं बनाया तो'... कांग्रेस को होगा बड़ा नुकसान जी  परमेश्वर | If Dalit Not Made Deputy Chief Minister, Top Karnataka Congress  Leader's Warning | TV9 Bharatvarsh

के एच मुनियप्पा

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री केएच मुनियप्पा यांनी यावेळी कर्नाटकातील देवनहल्ली मतदारसंघात ४,६३१ मतांनी विजय मिळवला. तीन दशकांपासून ते लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी 60 च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि अजूनही विपुल राजकीय यश मिळवत आहेत ज्यात सलग सात निवडणुकांमध्ये कोलार जागा जिंकणे समाविष्ट आहे. मुनियप्पा हे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्रीही राहिले आहेत. 

Muniyappa was told by minorities | मुनियप्पा को अल्पसंख्यकों ने सुनाई  खरी-खोटी | Patrika News

केजे जॉर्ज

केलचंद्र जोसेफ जॉर्ज हे एचडी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या आणि मध्यम आकाराचे उद्योग मंत्री आणि बेंगळुरू विकास आणि नगर नियोजन मंत्री होते. यापूर्वी ते कर्नाटकचे गृहमंत्री होते. जॉर्ज 1968 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांची राजकीय कारकीर्द 1969 मध्ये गोनीकोप्पल शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर सुरू झाली. वीरेंद्र पाटील सरकारच्या काळात त्यांनी परिवहन, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्रीपदही भूषवले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सर्वात विश्वासू माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. 

Karnataka cabinet: KJ George's profile - Oneindia News

एम बी पाटील 

मल्लनगौडा बसनगौडा पाटील यांनी कर्नाटकचे गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. ते यापूर्वी सिद्धरामय्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री होते. ते लोकसभेचे माजी सदस्य आहेत आणि कर्नाटक विधानसभेचे सदस्य म्हणून पाचव्यांदा निवडून येत आहेत. ते BLDE असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. विविध सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. 

Karnataka Congress gets ex-minister MB Patil as Lingayat face in leadership  panel | Bangalore News, The Indian Express

सतीश जारकीहोली

सतीश जारकीहोळी यांचा जन्म 1962 मध्ये कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात झाला. ते तिथून निवडणूक लढवतात. ते जिल्ह्यातील येमकनमर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जारकीहोळी हे काँग्रेसचे नेते तसेच व्यापारी आहेत. जारकीहोळी यांचे दोन भाऊ रमेश जारकीहोळी आणि बालचंद्र जारकीहोळी हे देखील आमदार आहेत.

कर्नाटक: कांग्रेस नेता सतीश जारकीहोली ने मांगी माफी, हिंदू शब्द पर दिया था  विवादित बयान - karnataka Congress leader Satish Jarkiholi apologizes for  his statement on term Hindu ntc ...

प्रियांक खरगे

 प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय  अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र असून ते काँग्रेसचे नेते आहेत. प्रियांक खर्गे सध्या कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. या जागेवरून प्रियांग खर्गे हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कर्नाटक काँग्रेसमध्ये प्रियांक खरगे यांच्या नावावरही एक विक्रम नोंदवला गेला आहे. राज्यातील सर्वात तरुण मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. 2016 मध्ये ते काँग्रेसच्या काळात मंत्री होते. 

बोले- प्रधानमंत्री की आलोचना तो होगी ही; आप हर बार विक्टिम कार्ड खेलते हैं  | Mallikarjun Kharge Vs Narendra Modi; Congress MLA Priyank Kharge  Controversy - Dainik Bhaskar

रामलिंगा रेड्डी

रामलिंगा रेड्डी हे कर्नाटक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. ते 2 सप्टेंबर 2017 ते 17 मे 2018 पर्यंत गृहराज्यमंत्री आणि 18 मे 2013 ते 2 सप्टेंबर या काळात कर्नाटकचे परिवहन मंत्री राहिले आहेत. रेड्डी 1973 मध्ये एनएसयूआयमध्ये सामील झाले होते. विद्यार्थीदशेपासूनच त्यांना संघटनात्मक कार्यात रस होता. 

बीटीएमः रामलिंगा रेड्डी के पास 4 दशक का अनुभव, विपक्षियों पर पड़ सकता है  भारी - ramalinga reddy btm layout assembly constituency karnataka election  2018 bjp congress - AajTak

जमीर अहमद खान 

यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार जमीर अहमद खान यांनी चामराजपेट विधानसभा मतदारसंघात ५३९५३ मतांनी विजय मिळवला. चामराजपेट मतदारसंघातून ते ४ वेळा आमदार आहेत आणि नॅशनल ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत. 

B.Z.ZAMEER AHMED KHAN MLA Election Results 2023 LIVE Counting and Updates -  Karnataka Candidate and Party Wise Result Latest News in Hindi | TV9  Bharatvarsh
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!