राहुल गांधींचे ‘ ये दुख काहे खतम नही होता बे..’| आधी संसदीय सदस्यत्व गेले, आता पाठवली राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस

खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांना दिल्लीतील लुटियन झोनमधील तुघलक लेनमधील त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ऋषभ | प्रतिनिधी

नवी दिल्ली: खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांना दिल्लीतील लुटियन झोनमधील तुघलक लेनमधील सरकारी बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अधिकार्‍यांनी सांगितले की नियमानुसार राहुल गांधींना 30 दिवसांच्या आत घर सोडावे लागेल.

राहुल गांधी यांना शुक्रवारी सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर २४ तासांनी खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले. गुजरातमधील सुरत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना २०१९ मध्ये मोदी आडनावावर उपरोधक आणि विपरीत टिप्पणी केल्याबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले. गांधींना भारतीय दंड संहिता कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या कलमांतर्गत कमाल शिक्षा दोन वर्षांची आहे.

भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या कथित “सर्व चोरांना मोदी हेच आडनाव कसे आहे…” या कथित टिप्पणीबद्दल खटला दाखल केला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!