महाराष्ट्राच्या राजकारणाचा धुरळा हवेत विरला ! कॅबिनेट मध्ये लागली ‘यांची’ वर्णी, वाचा सविस्तर

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर झालेले असले तरी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र लांबणीवरच पडणार असल्याचे कळते.

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेबडेस्क १४ जुलै : महाराष्ट्रातल्या पवसातल्या राजकारणाची मजाच न्यारी असते. कधी बांधलेली मोट फिस्कटते तर कधी खिजगणतीतही नसणारी जोडगोळी सत्तेच्या केंद्रस्थानी येऊन बसते. मुसळधार पाऊस पडत असतानाच कांदा भजी सोबत चहा आणि समोर राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली साठमारी हे जनतेसाठी पर्फेक्ट एंटरटेनमेंट कॉम्बिनेशन गेल्या ३-४ वर्षांपासून ठरत आले. आता मागेच महाराष्ट्राच्या राजकारणात थोरल्या पवारांच्या ‘राजीनामास्त्र’ नाटकाचा पडदा पडला आणि एका नव्या नाटकाची नांदी झाली. त्या नाटकाचा दूसरा अंक आज पार पडला. मंत्रिमंडळात फरेबदलासह खातेवाटप झाले त्यात राष्ट्रवादीच्या आमदारांना मनाजोगती खाती मिळाली.

Politics News in Marathi; Current Indian Political Updates, Latest National  Political News | राजकारण न्यूज; भारतीय राजकीय अपडेट्स आणि बातम्या

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर झालेले असले तरी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र लांबणीवरच पडणार असल्याचे कळते. केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नसल्याचे समजते. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील नाराज नेत्यांच्या नशिबी आणखी वेटिंगच असणार आहे. त्यामुळे त्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

‘याच साठी केला होता अट्टाहास’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहेत. तसंच छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री झाले आहेत तर धनंजय मुंडे हे कृषी मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून मिळून आता मंत्रिमंडळात २९ मंत्री असणार आहेत. तर सविस्तर जाणून घेऊ कुणाला कुठलं खातं मिळालं आहे.

Beed: Banner featuring Ajit Pawar as future CM causes speculation in  political circles | www.lokmattimes.com

कोणाला कोणतं खातं?

  • अर्थ व नियोजन- अजित पवार
  • सहकार- दिलीप वळसे पाटील
  • कृषी- धनंजय मुंडे
  • अन्न व नागरी- छगन भुजबळ
  • महिला व बालविकास- आदिती तटकरे
  • क्रीडा- संजय बनसोडे
  • मदत व पुनर्वसन- अनिल पाटील
  • अन्न व औषध प्रशासन- धर्मरावबाबा अत्राम
  • वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ

कुणाची खाती काढून कुठली खाती दिली?

  • अब्दुल सत्तार – कृषी खाते काढून- अल्पसंख्याक विकास
  • संजय राठोड- अन्न आणि औषध प्रशासन काढून मृदा आणि जलसंधारण
  • अतुल सावे- सहकार खाते काढून – ओबीसी कल्याण

मुख्यमंत्र्यांकडे मग काय राहिलं ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिजकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत.

Maharashtra Cabinet Expansion Eknath Shinde Expand Cabinet Today | Maharashtra  Cabinet Expansion: महाराष्ट्र में सरकार गठन के करीब 40 दिन बाद शिंदे  कैबिनेट का आज विस्तार, 18 मंत्री ले ...

गृहमंत्रीपद फडणवीस यांच्याकडेच

उपमुख्यमंत्र्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. तर परंपरेस स्मरून अजितदादांकडे अर्थ आणि नगरनियोजन सारखी घशघशीत खाती आली आहेत.

शिंदे गट आणि भाजपमधून किती खाती गेली?


शिंदे गटाकडून अजित पवार गटाच्या खात्यात तीन मंत्रीपदे गेली आहेत. हे विभाग कृषी, अन्न व औषध प्रशासन, मदत आणि पुनर्वसन आहेत. खात्यांच्या वाटपात भाजपला सहा मंत्रीपदांवर पाणी सोडावे लागले आहे. त्यात अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा आणि महिला व बालकल्याण मंत्रालये आहेत. 

20 crore advance 80 after becoming ministers Money sought to get place in  Shinde cabinet 4 arrested - 20 करोड़ एडवांस, 80 मंत्री बनने के बाद; शिंदे  कैबिनेट में जगह दिलाने को मांगे पैसे, 4 ...

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून,
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!