भारतीय निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांसाठी वेब पोर्टल

ऋषभ | प्रतिनिधी
5 जुलै २०२३: भारतीय निवडणूक आयोगाने ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून या पोर्टलवर आता सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे आर्थिक तपशील, निवडणूक खर्च आणि पक्षाला मिळालेला निधी याची माहिती द्यावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे हा या पोर्टलचा उद्देश आहे.

सर्व राजकीय पक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, भारतीय निवडणूक आयोगाने ही सुविधा आर्थिक विवरणपत्रे वेळेवर दाखल करणे सुनिश्चित करणे आणि राजकीय पक्षांना अहवाल सादर करण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सुविधा देणे अशा उद्दिष्टांसह तयार केली आहे.
जे राजकीय पक्ष ऑनलाइन मोडव्दारे आर्थिक अहवाल दाखल करू इच्छित नाहीत त्यांना न भरण्याची कारणे आयोगाला लिखित स्वरूपात कळवावी लागतील आणि विहित नमुन्यात सीडी, पेन ड्राइव्हसह हार्ड कॉपीमध्ये अहवाल सादर करणे सुरू ठेवू शकतात. आयोग त्या बदल्यात असे सर्व अहवाल ऑनलाइन प्रकाशित करील.