केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पैलवानांसोबतच्या बैठकीनंतर साक्षी मलिकने रेल्वेतील कामावर रुजू होत काढली आंदोलनाची हवा, दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी
गोवनवार्ता लाईव्ह 5 जून : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांमुळे संपावर असलेल्या साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी सोमवारी पुन्हा आपल्या रेल्वेतील नोकरीवर रुजू झाले. दोन्ही कुस्तीपटूंच्या नोकरीत पुन्हा रुजू होण्याची बाब समोर येताच ते आंदोलनापासून स्वतःला वेगळे ठेवत असल्याचे आणि आपल्या ध्येयापासून दुरावल्याचे मानले जात होते, मात्र दोन्ही कुस्तीपटूंनी लगेचच ट्विट करून या प्रकरणाचा खुलासा केला. ते म्हणाले की, न्यायाच्या लढाईत आम्ही कोणीही मागे हटलो नाही आणि करणारही नाही.
विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह देशातील अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू डब्ल्यूएफआय प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून आंदोलन करत होते. दरम्यान, 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नवीन संसदेचे उद्घाटन करत असताना या कुस्तीपटूंनी जंतरमंतर सोडले आणि तेथे महिला महापंचायत स्थापन करण्याच्या उद्देशाने नवीन संसदेच्या दिशेने कूच केली असता, त्यांना पोलिसांनी अडवून अटक करून नंतर सोडण्यात आले होते.
मात्र त्यानंतर पोलिसांनी या कुस्तीपटूंना पुन्हा जंतरमंतरवर बसू दिले नाही. यानंतर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सोमवारपासून भारतीय रेल्वेमध्ये ओएसडी (स्पोर्ट्स) म्हणून नोकरीवर रुजू झाले आहेत.
विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह देशातील अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू डब्ल्यूएफआय प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून आंदोलनास बसले होते. दरम्यान, 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नवीन संसदेचे उद्घाटन करत असताना या कुस्तीपटूंनी जंतरमंतर सोडले आणि तेथे महिला महापंचायत स्थापन करण्याच्या उद्देशाने नवीन संसदेच्या दिशेने कूच केले असता, त्यांना पोलिसांनी अडवून अटक केली होती. आणि नंतर सोडण्यात आले.
मात्र त्यानंतर पोलिसांनी या कुस्तीपटूंना पुन्हा जंतरमंतरवर बसू दिले नाही. यानंतर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक गृहमंत्र्यांशी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर सोमवारपासून भारतीय रेल्वेमध्ये ओएसडी (स्पोर्ट्स) म्हणून नोकरीवर रुजू झाले आहेत. पण एवढे मात्र खरे की केंद्रीय गृहमंत्र्यांनी थोडाफार का होईना कुस्तीपटूंच्या आंदोलनाची झळ कमी केलीय.
