अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल, उपचार सुरू
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आलीये, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ऋषभ | प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती खालावली आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६३ वर्षीय सीतारामन यांना हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणी आणि पोटाच्या किरकोळ संसर्गासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील त्यांच्या समाधी ‘सदैव अटल’ येथे त्यांना पुष्पहार अर्पण केला होता. त्याचबरोबर नुकतेच तामिळनाडूतील एका विद्यापीठात झालेल्या दीक्षांत समारंभातही त्या सहभागी झाल्या होत्या . यावेळी त्या म्हणाल्या होत्या की भारत आता जगातील फार्मसी म्हणून उदयास आला आहे. कारण देशात जागतिक दर्जाची औषधे परवडणाऱ्या किमतीत तयार होतात. संसदेचे हिवाळी अधिवेशन तसेच सध्याच्या सक्रियतेमुळे अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित.
निर्मला सीतारामन या भाजपच्या प्रभावी प्रवक्त्या आहेत
भारत सरकारच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 2003 ते 2005 पर्यंत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या होत्या. 03 सप्टेंबर 2017 पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभावी प्रवक्त्या होत्या. तसेच, त्या भारताच्या वाणिज्य आणि उद्योग (स्वतंत्र प्रभार) आणि वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आहेत. 03 सप्टेंबर 2017 रोजी त्यांना श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री करण्यात आले. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना अर्थमंत्रालयाचे महत्त्वाचे पद देण्यात आले.