अजब कारभार! एका पोलिसांची चक्क दोन ठिकाणी बदली?

राज्यातील तब्बल १२५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Kedar Parab | प्रतिनिधी

पणजी : पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्रात घोळ असल्याचे समोर येत आहे. शनिवारी दोन वेगवेगळ्या आदेशांद्वारे १२५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. यांतील एका आदेशात एकाच कॉन्स्टेबलची दोन ठिकाणी बदली केल्याचे दिसून आले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले, टाईपिंग करताना सदर चूक झाली असून सोमवारी दुरुस्त केली जाईल.

किती जणांची बदली?

पोलिस खात्याने शनिवारी पोलिस स्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार, दोन वेगवेगळे आदेश जारी करून १२५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यांतील एका आदेशाद्वारे १२ कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. यात एक सहाय्यक उपनिरीक्षक, ४ हवालदार आणि ७ कॉन्स्टेबल आहेत. दुसऱ्या आदेशाद्वारे ११३ जणांच्या बदल्या केल्या आहेत. यात २ महिला सहाय्यक उपनिरीक्षक, १० पुरुष सहाय्यक उपनिरीक्षक, २४ हवालदार, १ महिला हवालदार, १ हवालदार (चालक), १ हवालदार (आरटीओ), ६२ कॉन्स्टेबल, ४ महिला कॉन्स्टेबल आणि ८ कॉन्स्टेबल (चालक) यांचा समावेश आहे. यांतील एका कॉन्स्टेबलची पणजी शहर पोलिस स्थानकातून एका आदेशाद्वारे वाहतूक विभाग कळंगुट येथे, तर दुसऱ्या आदेशाद्वारे वाहतूक विभाग हणजुणे येथे बदली केली गेली आहे. ही टाईपिंग मिस्टेक असून आज ती दुरुस्त केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बदल्यांचं सत्र

दरम्यान, १७ फेब्रुवारीलाच पोलिस बदल्या करण्यात आल्या होत्यात. पोलिस खात्यात चार वेगवेगळे आदेश जारी करण्यात आले होते. या आदेशाद्वारे मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची बदली केली होती. यात पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक मिळून ४३ अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. याबाबतचा आदेश पोलिस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार मुख्यालयाचे अधीक्षक निधीन वालसन यांनी जारी केले होते.

कुठे कुणाची बदली?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.