पोलीस भरती : पावसामुळे निवड चाचणी लांबणीवर

९१३ कॉन्स्टेबल पदांसाठी हजारो अर्ज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात पोलीस कॉन्स्टेबल पदी ९१३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर १६ जूनपासून सुरू होणारी निवड चाचणी आता पुढे ढकलली आहे. हजारो अर्ज आल्यामुळे अजूनही अर्जांची छाननीच सुरू आहे. त्यामुळे कॉललेटरही पाठवण्यात आलेली नाहीत. सर्व पदांसाठी ३० एप्रिलपर्यंत अर्ज मागवले होते. पण, अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे छाननीचे काम संपलेले नाही.

हेही वाचाः पॉलिटेक्निक परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात

कुणासाठी किती पदं

९१३ पोलीस कॉन्स्टेबल पदांमध्ये पुरुषांसाठी ७६७; तर महिलांसाठी १४६ जागा आहेत. पुरुषांच्या गटात ३४१ पदे खुल्या वर्गासाठी, १९ एससी, ११५ एसटी, ओबीसी २६२ तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३० पदे होती. महिलांच्या गटात ७१ पदे खुली, ० एससी, १८ एसटी, ३९ ओबीसी आणि आर्थिक दुर्बल वर्गासाठी १५ पदे; तर ९ पदे माजी सैनिकांसाठी, पुरुषांच्या ७६७ पदांमध्ये २० क्रीडापटूंसाठी राखीव तसंच महिलांच्या १४६ पदांमध्ये १२ पदे महिला क्रीडापटूंसाठी राखीव आहेत. वयोमर्यादा १८ ते २८ पर्यंत होती. सरकारी कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची सूट होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!