सिद्धी नाईक संशयित मृत्यूप्रकरणी पोलिसांनी महत्त्वपूर्ण आवाहन केलंय

सिद्धीच्या मृत्यूचं गूढ कधी उलगडणार?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या सिद्धी नाईक संशयास्पद मृत्यूप्रकरणी कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाहीये. अशातच आता पोलिसांकडून महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आलंय.

अनेक अनुत्तरीत प्रश्नांमुळे सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. पोलिस तपासातून अनेक गोष्टींचा उलगडा अजूनही होऊ शकलेला नाहीये. आधी हत्येचा आरोप, त्यानंतर कौटुंबिक वाद, त्यानंतर लव्ह ट्रॅन्गल अशा सगळ्या वेगवेगळ्या एन्गलमधून सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, आता सिद्धीच्या मृत्यूप्रकरणी लोकांनी सहकार्य करावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

पोलिसांचं आवाहन

कळंगुट पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी लोकांकडे मदतीचं आवाहन केलंय. सिद्धीला जर कुणी त्या दिवशी पाहिलं असेल तर त्यांनी पोलिसांच्या मदतीला पुढे यावं, असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान, माहिती देण्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय. तसंच 10 हजार रुपयांचं बक्षीसही माहिती देणाऱ्यास दिलं जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. सिद्धी नाईक संशयित मृत्यूप्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी आता सर्वसामान्य नागरीक पोलिसांना सहकार्य करतात का हे पाहणं महत्त्वाचंय.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धीच्या वडिलांची, तिच्या प्रियकरासह, चुल भावांची आणि बहिणीचीही चौकशी पोलिसांनी केली आहे. मात्र अजूनही या मृत्यूप्रकरणाचं गूढ उलगडू शकलेलं नसल्यानं, पोलिसांसमोरील आव्हानं कायम आहेत. 12 ऑगस्टला सिद्धीचा मृतदेह कळंगुट किनाऱ्यावर विचित्र अवस्थेत सापडला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिना संपत आला असला तरिही या घटनेबाबतचं गूढ कायम आहे.

हेही वाचा – नदीपात्रात सेल्फी घेणं महागात, तीन मित्र वाहून गेले

सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित नेमके न उलगलेले प्रश्न कोणते आहेत?

सिद्धी नाईक पर्वरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोचली?

म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्यानं ती बस स्थानकावर होती की नाही?

बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट; मात्र अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं ती पाण्यात कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले?

घराबाहेर पडल्यानंतर सिद्धी पर्वरीला जाण्याऐवजी कळंगुटला कशी काय पोहोचली?

जर तिला आत्महत्या करायची होती, तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला?

सिद्धी नाईकचा बुडून जीव गेला असेल, तर तिला पाण्यात कोणी ढकललं होतं?

मोबाईल फोन घरी ठेवून सिद्धी घराबाहेर का पडली असेल?

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप डीलीट करुन सिद्धी नेमकं काय लपवू पाहत होती?

हेही वाचा – VIDEO | Accident | Head Stuck in Cooker | पालकांनो, मुलं कधी काय करतील, याचा नेम नाही!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!