विलास मेथर हत्याप्रकरणाचा छडा लावल्यानं पर्वरी पोलिसांना डिजीपींनी दिली शाबासकी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी
पर्वरी : डिजीपी मुकेश कुमार मीना यांनी विलास मेथर हत्याप्रकरणी धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पर्वरी पोलिसांचं कौतुक केलं आहे. त्यांची भेट घेऊन डिजीपी मुकेश कुमार मीना यांनी पर्वरी पोलिसांच्या केलेल्या कामगिरीची दखल घेतली आहे. मेथर हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्यानं डिजीपींनी खास सन्मानपक्ष देऊन पोलिस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय. पर्वरी पोलिसांसह उत्तर गोव्यातीलही पोलिसांचा यावेळी सन्मान करण्यात आला. एकूण 6 पोलिस निरिक्षकांसह 26 जणांना यावेळी शाबासकी देण्यात आलीय
काय आहे विलास मेथर हत्याप्रकरण?
ऑक्टोबरच्या 15 तारखेला एक धक्कादायक घटना पर्वरीमध्ये घडली होती. पर्वरीतील सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्यावर पेट्रोल मिश्रित द्रव्य टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या इतिहासात आतापर्यंतची दिवसाढवळ्या अशाप्रकारे हल्ला करुन जिवंत माणसाला जाळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला होता. या हत्याप्रकरणाचे धागेदोरे सिंधुदुर्गातही आढळून आले होते.
शाबासकी दिल्यानंतरचा ग्रूप फोटो
