तीन मोबाईल चोरट्यांना पेडणे पोलिसांकडून अटक

१ लाख ३० हजार किमतीचे मोबाईल जप्त

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे पोलिसांनी तीन मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. जुलै महिन्यात सिद्धेश खोर्जुवेकर यांनी अज्ञात व्यक्तींने दोन मोबाईल चोरल्याच्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पण त्या नंतर तीन महिन्याच्या शोधकार्यात कुठलेही पुरावे सापडले नाही. पण तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.

मंगळवारी केली अटक

मंगळवारी पेडणे पोलीसांनी कळंगुट येथील संकेश चोडणकर, पुरबू रिंग सिंग आणि मोहन लाल बहादूर थापा यांना अटक करुन १ लाख ३० हजार किमतीचे मोबाईल पकडले
आहे. संकेश चोडणकर यांना दोन वेळा चोरी केल्याप्रकरणी अटक केली होती, असे या वेळी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पेडणे पोलिसांची कामगिरी

या शोध मोहिमेत निरिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गीरी, सागर खोर्जुवेकर, अर्जुन कलंगुटकर, संदेश वरक आणी विनोद पेडणेकर या पोलीसांचे मोलाचे योगदान आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!