सेसा वेदांता समूहाकडून कंपनीच्या आवारात वृक्षारोपण

कंपनीचे कर्मचारी, स्थानिक भागधारकांमध्ये रोपांचं वितरण केले

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला लाभ झाला आहे. अनेक देशातील प्रदूषणाचा टक्का घसरल्याचे, वन्य जीव मुक्त संचार करू लागल्याचे समोर आलं आहे. पर्यावरण कायम निरोगी ठेवण्यासाठी भविष्यात आपल्याला काम करणं आवश्यक आहे. हेच जाणून 5 जून रोजी संपूर्ण राज्यात सरकार, विविध संस्था, आस्थापनं, मोठमोठ्या कंपन्या तसंच वैयक्तीक स्तरावर पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. सेसा वेदांता समूहा जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण केले.

कंपनीचे कर्मचारी, स्थानिक भागधारकांमध्ये रोपांचं करणार वितरण

5 जून रोजी जगभर साजरा करण्यात आलेल्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सेसा वेदांता समूहाने वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाविषयी सेसा वेदांता समूहाने माहिती देताना सांगितलंय, गोवा वन विभागाच्या सक्रिय पाठिंब्यामुळे आम्ही फळांच्या रोपांची व्यवस्था करू शकलो. आम्ही आमच्या गेट लोकेशन आणि प्लांटच्या आवारात वृक्षारोपण मोहीम राबवली. याशिवाय आम्ही सेक्युरिटी, व्यवस्थापक, एचआर तसंच आमच्यासोबत बरोबर काम करणाऱ्या स्थानिक भागधारकांमध्ये ही रोपं वितरित करून त्यांनादेखील वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित केलं, असं सेसा वेदांता समूहाकडून सांगण्यात आलं.

निसर्गाला शरण जाणं गरजेचं

कोविड-19 मुळे माणसाला प्राणवायूचं महत्व समजलंय. निसर्गानुरूप असणाऱ्या आपल्या खाण्यापिण्याच्या, रहाण्याच्या सवयी आपण बदलल्या. घनदाट जंगल असो वा खोल समुद्र प्लॅस्टिकचं राज्य आज सर्वत्र पसरलेले आहे. “जे पेराल ते उगवेल” या म्हणीप्रमाणे आपण जे निसर्गाला देऊ, निसर्ग आपल्याला त्याची परत फेड करतो. म्हणूनच तर आपण जेवढे प्लॅस्टिक नदया, नाले, समुद्रात फेकून दिलं ते सर्व पाहिजे तर व्याजासकट म्हणा; निसर्गाने आपल्याला तौक्ते चक्रीवादळाने परत दिलं. तौक्ते वादळानंतर आपले समुद्र किनारे कित्येक टन प्लॅस्टिक कचऱ्याने भरलेले होते. आज निसर्गाला शरण जाणं गरजेचं आहे. निसर्गाशी अनुरूप जीवनशैलीचा अवलंब करणं गरजेचं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!