PHOTO STORY | राज्यव्यापी कर्फ्यूचा पहिला दिवस; पणजी शहरातील छायाचित्रे

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोरोनाची दुसरी लाट धोकादायक असल्याचं नमूद करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवार 9 मे पासून 15 दिवसांचा राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. रविवार 23 मे पर्यंत हा कर्फ्यू जारी असेल. या कर्फ्यूच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. किराणामाल दुकानं सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत खुली असणार आहेत. तसंच रेस्टॉरंट्सना टेक अवे ऑर्डर्ससाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी देण्यात आलीये. या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर एनआयने टीपलेली ही पणजी शहरातील छायाचित्रे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!