PHOTO STORY | सांजाव… सां जुवांव घुंवता मुरे…

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: चातक पक्ष्याप्रमाणेच माणूसही ज्या पावसाची आतूरतेने वाट पाहतो, तो पाऊस अखेर बरसला आणि सर्वांनाच चिंब करून गेला. त्यामुळे निसर्गासह सर्वत्र एक नवा उत्साह आला. या मान्सूनची रंगत गोव्यात अनोख्या पद्धतीने साजरी होते. गोव्यात पारंपरिक सांजाव उत्सवाची धूम आहे. डोक्यावर फुलांचा मुकूट चढवून, अंगावर वेलींचा साज घेऊन पाण्यात डुबकी मारणारी मंडळी, सजलेल्या होड्यांची रंगतदार स्पर्धा आणि संगीत नृत्यांचा जंगी लवाजमा अशा थाटात गोव्यात सांजाव उत्सवाने चैतन्याचे रंग भरले जातात. मात्र कोविड महामारीच्या संकटामुळे यंदा राज्यात निर्बंध आहेत. त्यामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्यात. मात्र राज्यातील विविध भागात वर्षपद्धतीप्रमाणे ‘सांजाव’ साजरा करण्यात आलाय. या उत्सवाचं स्वरूप जरी मोठं नसलं, तरी ख्रिस्ती बांधवांनी आपल्या कुटुंबियांसोबत या उत्सवाचा आनंद लुटलाय. भले यंदा सांजाव गीत आणि ‘व्हीवा सांजाव’ चा जोष दिसून आला नाही, ‘सांजाव’ उत्सव धुमधडाक्यात साजरा केला नाही, तरी पारंपरिक रितीरिवाज केल्याची माहिती मिळतेय. गोव्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर विवेक नाईक यांनी दक्षिण गोव्यातील राय गावातील सांजाव उत्सवाची ही छायाचित्रे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!