PHOTO STORY | पाऊस संततधार, रस्त्यात खड्डे फार

पणजीतील करंझाळे भागात रस्त्याची झालेली चाळण

नारायण पिसुर्लेकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात मागचे काही दिवस पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहतायत, धरणे ओव्हरफ्लो झालीत आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलंय. या पावसामुळे ‘पाऊस संततधार, रस्त्यात खड्डे फार’ अशी काहीशी स्थिती राज्यातील रस्त्यांची झालीये. संततधार पावसात अनेक रस्ते उखडल्यानं रस्त्यांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होतायत. नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचंच समीकरण आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असतं. आता तर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी खड्डेमय रस्ते हे पावसाचं पाणी भरल्यानं जलमय झालेत. पावसाचं पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होतेय. राजधानी पणजीतील करंझाळे भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली पहायला मिळतेय. या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यानं वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावं लागतंय. या भागात रस्त्याची झालेली दुर्दशा ‘द गोवन एव्हरीडे’चे छायाचित्रकार नारायण पिसुर्लेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!