Photo Story | पाटो पणजी येथील ‘ज्ञान सेतू’…

'ज्ञान सेतू' नेत्रदीपक रोषणाईने झळकविण्यात आला

रजत सावंत | प्रतिनिधी

पणजी : पाटो पणजी येथील ज्ञानसेतूचे उद्धाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा आणि वाचनालयाला जोडणाऱ्या पुलाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी सांगितले. खांबाचा वरचा भाग राष्ट्रध्वजाच्या रंगांनी रंगविण्यात आला त्याखालील उर्वरित भागावर ‘ओम सर्वे भवन्तू सुखिनः, सर्वे सन्तु निरामय आणि ‘ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य’ ही गायत्री मंत्राची अक्षरे रंगविण्यात आली आहेत. या खांबाला ‘ज्ञानस्तंभ’ असे नाव देण्यात आले आहे. हा ‘ज्ञान सेतू’ नेत्रदीपक रोषणाईने झळकविण्यात आला आहे.
हेही वाचाःPhoto Story | Navratri Special Day – 5 | हिरवा रंग निसर्गासह पौष्टिक गुण आणि प्रजननक्षमता दर्शवतो…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!