PHOTO STORY | अत्यावश्यक नसलेली दुकानंही चालूच

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सरकारने 9 ते 24 मे पर्यंत राज्यव्यापी कर्फ्यू लावलाय. या काळात अत्यावश्यक सेवांनाच काम करण्याची मुभा सरकारने दिली आहे. मात्र पेडणे तालुक्यातील किनारी भागात अनावश्यक दुकानंही चालू असल्याचं दिसून आलंय. या दुकानांमध्ये चप्पल, कपडे ही दुकाने सुरू आहेत. हरमल किनारी भागात सुरू असलेल्या या बिगरगोमंतकीयांच्या दुकानांवर कारवाई होतानाही दिसत नाही. हरमल किनारी भागात निवृत्ती शिरोडकर यांनी टिपलेली अनावश्यक दुकानांची काही छायाचित्रे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!