PHOTO STORY | ‘जनता कर्प्यू’मुळे समुद्रकिनारे सुने सुने…

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः राज्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रविवार 9 मे पासून राज्यव्यापी जनता कर्फ्यू लागू केला आहे. 23 मे पर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वप्रकारचे रिसोर्ट्स, क्लब्स बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. सरकारच्या आदेशाचं पालन करत कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी जनतेनं व्यावसायीकांनी पाठिंबा देऊन किनारी भागातील आस्थापनं बंद ठेवलीत. किनारी भागात फेरफटका मारला असता रविवारी किनारे सुने सुने दिसून आले. पर्यटन हंगामात गजबजलेल्या समुद्र किनाऱ्यांवर रविवारी कुणीच नसल्यानं किनारे ओस पडलेले दिसले. मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल आणि केरी, तेरेखोल भागातील बीच शॅक्स, रेस्टारंट्स बंद दिसली. निवृत्ती शिरोडकर यांनी रविवारी पेडणे तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवरील टिपलेली ही काही छायाचित्रे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!