PHOTO STORY |मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस, तरीही उसंत न घेता विकासकामांचा NON-STOP धडाका सुरूच

ऋषभ | प्रतिनिधी
गोवा राज्य : डॉ प्रमोद सावंत 2012 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्या अनेक पूर्वसुरींच्या विपरीत, सात वर्षात गोव्याची सत्ता हाती घेतली. त्यांच्या विरोधकांनी त्यांना “गोव्याचे अपघाती मुख्यमंत्री” मानले असले तरी, डॉ. प्रमोद यांनी तत्कालीन निवडणुकीनंतर, चाळीस आमदार असलेल्या विधानसभेत वीस जागा जिंकून भाजपचे सरकार स्थापन केले.

मुख्यमंत्री या नात्याने, डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या टीमने गोंयकरांना कोविडच्या काळात यथायोग्य मार्गदर्शन केले – लस सर्वांसाठी उपलब्ध करून देऊन, गोवा हे संपूर्ण लसीकरण झालेले पहिले राज्य बनले.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविडच्या काळात जेव्हा त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या कार्यशैलीवर टीकेचे मोहोळ उठले , तेव्हा डॉ. सावंत यांनी आजारांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला आणि आरोग्य विभागाला घेऊन पुन्हा योग्य मार्गावर काम करण्यास सुरुवात केली व त्यात त्यांनी यशही प्राप्त केले. अनेक असाध्य प्रश्न चिकाटीने आणि सबुरीने सोडवत डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिवंगत भाई पर्रीकरांच्या आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही यांची खबरदारी घेतली.
आज सोमवार २४ एप्रिल २०२३, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस फक्त त्यांच्या साखळी मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण गोव्यात साजरा केला गेला. दुग्धशर्करा योग म्हणजे आजच्या दिवशी माय मिलाग्रीसचे फेस्त आणि आई लइराईची जत्रा ! आज जणू मुख्यमंत्र्यांनी , दिवंगत भाई पर्रीकरांच्याच डायरीतले एखादे पान वाचले असावे. ज्या प्रमाणे भाई पर्रीकर अगदी कशाचीही तमा न बाळगता जंनतेकरीता पूर्णतः वाहून घ्यायचे त्याच पद्धतीने आज दोतोर सावंतांचा वावर दिसून आला. एरव्ही व्ययक्तिक बाबींचा विचार न करणारे असे दोतोर, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास मान देऊन आपला वाढदिवस अनेक वर्षांनी साजरा करण्यास तयार झाले. तरीही त्यांनी आपले व्यस्त वेळापत्रक डोळ्यांसमोरून सरकू दिले नाही.
असा राहिला “मुख्यसेवकाचा” दिवसभराचा कारभार
देश-विदेशात नावलौकिक प्राप्त झालेल्या आणि लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी सोमवारी सकाळी कुटुंबियांसह शिरगावला भेट दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंतांनी श्री लईराई देवीचं दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले.
फोटोज पहा :
मुख्यमंत्री सावंत यांनी वाढदिवसानिमित्त साळगाव पंचायतीत स्वयंपूर्ण मित्र या नात्याने भेट दिली. सेवा सुशासन जनकल्याण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डॉ. सावंत यांनी गावातील लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
फोटोज पहा :
भक्तांच्या हाकेला धावणारी सायबीण म्हणून भाविकांत म्हापशातील मिलाग्रीस सायबिणीबाबत श्रद्धा आहे. यामुळे सायबिणीला तेल, मेणबत्ती व फुलं अर्पण केली जातात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी मिलाग्रीस सायबिणीला तेल, मेणबत्ती आणि फुलं अर्पण करून तिचे आशीर्वाद घेतले.
फोटोज पहा :
राजकारण करत असताना समाजकारणावर अधिक भर देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सायंकाळी “सेवा, सुशासन, जनकल्याण” उपक्रमाचा एक भाग म्हणून पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षांना हिरवा झेंडा दाखवला.
फोटोज पहा :
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दाखवला व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षांना हिरवा झेंडा




दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधींना मदत करण्यासाठी, पर्पल फेस्ट दरम्यान राज्यात प्रथमच व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षांचे अनावरण करण्यात आले. या वाहनात दोन सदस्य दिव्यांग प्रवाशासोबत जाऊ शकतात. या रिक्षामध्ये चढताना रिक्षाचा मागचा दरवाजा रॅम्प मध्ये रूपांतरीत होतो. याशिवाय, सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिले असून व्हीलचेअरसाठी चारही बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा 50 वा वाढदिवस भाजप मुख्यालय, पणजी येथे प्रदेशाध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे, मंत्री, आमदार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने हितचिंतक व कार्यकर्त्यांनी साजरा केला.
फोटोज पहा :





