PHOTO STORY | ढवळी येथे स्क्रॅपयार्ड आगीत भस्मसात; सुरक्षेचा मुद्दा पुनः एरणीवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

गोव्यात जळी थळी भंगारअड्डे उभे राहणे आणि त्यांना कालांतराने आग लागणे हे काही नवीन नाही. बऱ्याचदा हे अनअधिकृत अड्डे अत्यावश्यक अशा मानकांची पायमल्ली करून आपले काम सुरूच ठेवतात. आणि मुख्य म्हणजे हे भंगारअड्डे कुणा तरी प्रभावी व्यक्तिचा वरदहस्त डोक्यावर असल्याशिवाय हा गैरकारभार करणे शक्य नाही. पण मग यात नाहक त्रासास सामोरे जावे लागते ते त्या लोकवस्तीत वास्तव करून असलेल्या सामान्य नागरिकांना. अकस्मित लागलेल्या आगीच्या धूरामुळे श्वसनाचे त्रास-अस्थमा, त्वचा रोग, मायग्रेंन, पोटात मळमळ किंवा तत्सम व्याधी अकारण लोकांच्या माथी येऊन बसतात.

आज शुक्रवार 5 मे 2023 रोजी ढवळी येथे बगल रस्त्याच्या बाजूला असलेला एक अनधिकृत भंगारअड्डा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे. ज्वलनशील रसायनांमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक कयास आहे. सदर घटनेमुळे फोंडा- मडगांव वाहतूक ठप्प झाली असून लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अग्निशामक दलाचा बंब हजर असून आग आटोक्यात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ही छायाचित्रे पहा :

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!