लक्षवेधी Photo | वनरक्षकाच्या हातात तब्बल ३ मीटर लांबीचा किंग कोब्रा

नेत्रावळी अभयारण्यातील फोटो

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्याला समृद्ध असा निसर्ग लाभलाय. याच जंगलाचाही भाग मोठा आणि विस्तीर्ण असा आहे. राज्यातील नेत्रावळीमधील असाच एक फोटो समोर आलाय. हा फोटो सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय.

लक्षवेधी

नेत्रावळी अभयारण्य हे राज्यातील एक वैभवसंपन्न असं अभयारण्य समजलं जातं. याच अभयारण्यातील एक फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. हा फोटो पाहून अनेकजण अवाक् झालेत. या फोटोमध्ये एका वनरक्षकानं तब्बल ३ मीटर लांब कोब्रा हातात धरलाय. सराईतपणे किंग कोब्रा हातात घेतलेला हा वनरक्षक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा – दीड वर्षाचं बाळ थोडक्यात बचावलं! अपघातात कारचा चक्काचूर, 6 जण जखमी

फोटोची चर्चा

नेत्रावळी अभयारण्यातील या वनरक्षकाचं नाव आहे, सुधाकर वेळीप. सुधाकर वेळी पांनी दोन हातांनी किंग कोब्राला पकडलंय. ज्या आत्मविश्वासानं त्यांनी किंग कोब्राला हाताळलंय, त्याची झलक या फोटोतून पाहायला मिळतेय. हा फोटो सोशल मीडियात चांगलाच गाजतोय. अवाढव्य किंगकोब्रा पाहून कोणत्याही सर्वसामान्य माणसाला घाम फुटेल. पण सुधाकर वेळीप यांची किंग कोब्राला पकडल्यांनतरची फोटोतील देहबोली चकीत करणारी आहे. हा फोटो नेमका कुणी काढला, हे कळू शकलेलं नाही. मात्र सध्या सर्वदूर या फोटोची चर्चा पाहायला मिळतेय.

हेही पाहा – 🛑 Bulletin | वार्ता गोव्याची | 30 MAR 2021

हेही वाचा – 5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!