PHOTO CAPTION: भारतीय जनता युवा मोर्चा वाळपईतर्फे वृक्षारोपण

कार्यक्रमाला युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

वाळपईः भारतीय जनता युवा मोर्चा वाळपई यांनी 4 जुलै रोजी उसगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भारतीय जनता युवा मोर्चा वाळपई मतदार संघातील पार्टीचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शुभम गावकर यांनी केलं. शुभम गावकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून दिलं. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे वाळपई मतदारसंघातील तमाम युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!