औषध निर्मिती, वितरण व्यवस्थेत काम करणारेही आता फ्रंटलाईन कोविड योध्दा

दिव्यांग आणि तत्सम असलेल्या नागरीकांनाही लसीकरणासाठी प्राधान्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सध्याच्या महामारीच्या काळात औषधांची वाढलेली गरज आणि मागणी लक्षात घेता औषध निर्मिती, वितरण व्यवस्थेत काम करणायांनाही आता फ्रंटलाईन कोविड योध्दा, असा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी केलीय. त्याचबरोबर दिव्यांग आणि तत्सम असलेल्या नागरीकांनाही लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलंय.
वेळेत होणारा औषधोपचार हाच सध्या तरी कोरोना रूग्णासाठी महत्वाचा ठरत आहे. ही विविध प्रकारची औषधं तयार करणाया कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार तसंच ती औषध वेळच्यावेळी हाॅस्पिटल्स आणि मेडीकलमध्ये पोहोचवणारे कामगार, यांचंही काम सध्या अत्यंत महत्वाचं बनलं आहे. त्यामुळं या संपुर्ण प्रक्रीयेत कार्यरत असणाया कामगारवर्गाला आता फ्रंटलाईन कोविड योध्दा समजण्यात येईल, त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर दिव्यांग आणि तत्सम नागरीकांनाही लसीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. यासंदर्भातले आदेश आरोग्य विभागाकडून लवकरच संबंधितांपर्यंत पोहोचतील, असंही मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांनी सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!