एवढ्या रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार !

केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात केली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: केंद्र सरकारने सर्वसामांन्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात मोठी कपात करुन दर कमी केलेत. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.
हेही वाचाःसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘ही’ योजना…

पेट्रोलचे दर ९.५ रुपये तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी

पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले आहे. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली.
हेही वाचाःबारावीचा निकाल जाहीर ; मुलींनी मारली बाजी… 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!