CRIME | आरोग्यमंत्र्यांच्या नावे बनवेगिरी करणारा गजाआड

राजस्थानच्या अरमान रफिक या तरुणाला अटक; लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नावाने बोगस फेसबुक प्रोफाईल तयार करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर कक्षाच्या पोलिसांनी राजस्थानमधील भारतपूर येथे जाऊन अरमान रफिक याला अटक केली. त्याला गोव्यात आणण्यात आलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हेही पहाः Crime | Special Report | पर्वरीतील बंगल्यातून 12 संशयितांना अटक

अधिक प्रसिद्ध व्यक्तींची नावे बोगस प्रोफाईल

संशयित अरमान रफिक हा फेसबुकवर अधिक प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची बोगस प्रोफाईल तयार करत होता. या बोगस प्रोफाईलचा वापर करून तो त्या व्यक्तीच्या नावाने मेसेजिस पाठवून त्यांच्याकडून पैसे मागत होता. त्याने यापूर्वी अशाप्रकारचे प्रोफाईल तयार करून पैशांची मागणी केली होती. आरोग्यमंत्री राणे यांच्या नावाने तयार केलेल्या बोगस प्रोफाईलचा वापर करून लोकांकडून पैसे उकळण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

अखेर ताब्यात घेतलं…

आरोग्यमंत्र्यांच्या बोगस नावाने प्रोफाईल तयार केल्याची माहिती सायबर कक्षाच्या पोलिसांना मिळाली. त्याच्या आधारे त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. या चौकशीत बोगस प्रोफाईल तयार करणारी व्यक्ती राजस्थान येथील असल्याने त्याची पूर्ण माहिती काढून ताब्यात घेतले.

हेही पहाः Lockdown? | कर्नाटकाच्या वेशीवर चोख पोलिस बंदोबस्त, या राज्यातून येणाऱ्यांना कोविड टेस्ट बंधनकारक

सोशल मीडियाचा गैरवापर

यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धमकावण्याचे कॉल व्हॉट्स अ‍ॅप वरून येत होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक झाली होती. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवरून काही अश्लिल चित्रफिती पाठवण्यात आल्या होत्या. त्याची तक्रार सायबर कक्षाकडे नोंद झाली होती. मात्र, या प्रकरणाचा अजूनही तपास लागलेला नाही. फेसबूक व व्हॉट्स अ‍ॅपचा गैरवापर करून फसवणूक तसेच धमकावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!