पेडणे वाहतूक सहाय्यक अधिकारी वसूल करतात खंडणी

अखिल गोवा बस मालक संघटनेचा आरोप; बस संघटनेकडून अधिकाऱ्याला घेराव

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मोरजी आणि मांद्रेत खासगी बसेस सुरू असताना दोन कदंब बसेसना परमिट कसं देण्यात आलं, असा सवाल अखिल गोवा बस मालकाच्या संघटनेने सुदीप ताम्हणकर यांनी उपस्थित केलाय. याविषयी खासगी बस व्यवसायिकांना विश्वासात का घेतलं गेलं नाही, असाही प्रश्न त्यांनी उचलून धरला. ताम्हणकरांच्या नेतृत्वाखाली पेडणे वाहतूक सहाय्यक अधिकारी मेघश्याम पीळर्णकर यांना संघटनेकडून घेराव घालत याविषयी जाब विचारण्यात आला. तसंच संघटनेकडून कदंब बसेसचे दोन्ही परमिट रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचाः सिद्धी नाईक मृत्यूप्रकरण | कधी, कुठे, केव्हा, काय घडलं?

पेडणे वाहतूक अधिकारी वसूल करतात खंडणी

खाजगी बसमालकांकडून परमिटसाठी तसंच स्वतःसाठी वेगळे पैसे घेता. कदंब बसेसना परमिट देताना या खाजगी बस व्यवसायिकांची आठवण झाली नाही का, असा सवाल ताम्हणकरांनी पेडणे वाहतूक अधिकाऱ्यांना यावेळी विचारला. वाहतूक खात्याचे अधिकारी बसमालकांकडून कायदेशीर फी घेतातच. शिवाय हा अधिकारी स्वतःसाठी सहा ते सात हजार रुपये खंडणी वसूल करतो, असा आरोप ताम्हणकरांनी केलाय.

पेडणे वाहतूक अधिकाऱ्यावर ताम्हणकरांचा आरोप

मोरजी ते म्हापसा तसंच मांद्रे ते म्हापसा या भागात खासगी बस सेवा सुरू असताना कदंब बस सेवा कशी काय सुरु केली, असा सवाल ताम्हणकरांनी विचारलाय. तसंच आमदाराने तुम्हाला अतिरिक्त नोकरीत वाढ करण्याची किंवा मुलाला नोकरी देण्याची ऑफर दिली म्हणून तुम्ही ही कदंब सुरु केली, असा आरोप ताम्हणकरांनी पेडणे वाहतूक अधिकाऱ्यावर केलाय.

हेही वाचाः पंतप्रधान मोदींवर टीका ; ६२ वर्षीय व्यक्तीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक

सोपटेंना लोकांची सहानभूती हवी

सध्या राज्यात निवडणूकीचे वारे वाहत असल्याने आमदार सोपटेंना लोकांची सहानभूती हवी आहे. त्यासाठी खाजगी प्रवासी बसेच्या वेळेला त्यांनी कदंब बस सेवा सुरु केल्याचा आरोप बसमालक विठ्ठल यांनी केला. शिवाय कदंबा बसेसना सर्वकाही मिळतं. कधीकधी कदंब क्लीनर अर्धे पैसे घेऊन प्रवाशांना सोडतात, त्यावर कुणाचा अंकुश नाही, असंही विठ्ठल यांनी म्हटलंय.

हेही वाचाः अफगाणिस्तानमधील अराजकतेसाठी जो बायडेन जबाबदार !

परमिट हंगामी स्वरूपाचं

बसमालकांनी निवेदन स्वरूपात आपल्या मागण्या यापूर्वीच सादर केल्या होत्या. त्याविषयी आजपर्यंत बसमालकांची बैठक का बोलावली नाही, असा सवाल ताम्हणकरांनी विचारलाय. तसंच कदंब बसेलना दिलेलं परमिट रद्द करा, अशी मागणीही संघटनेनं केलीये. संघटनेच्या या मागणीवर हे परमिट हंगामी स्वरूपाचं आहे, त्यावर अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ. तुमचं निवेदन लेखी स्वरूपात द्या, असं पेडणे वाहतूक अधिकाऱ्यांनी संघटनेला सांगितलं.

हेही वाचाः वाजपेयी यांचे कार्य अविस्मरणीय

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी हजर

वाहतूक अधिकाऱ्याला घेराव घातल्याची माहिती पेडणे पोलीसांना मिळताच पेडणे पोलिस निरिक्षक जिवबा दळवी स्वतः जातीने घटनास्थळी उपस्थित राहिले. बसमालकांचे प्रश्न बरोबर असल्याने ते मान्य करून हा विषय चर्चा करून सोडवावा अशी सुचना दळवींनी यावेळी केली.

हा व्हिडिओ पहाः FENNY | SPECIAL COVER | पोस्टातर्फे काजू फेणीवर ‘स्पेशल कव्हर’ प्रकाशित

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!